six people died in 24 hours on mumbai ahmedabad highway due to potholes zws 70 | Loksatta

खड्डय़ांमुळे २४ तासांत सहा जणांचा मृत्यू ; मुंबई-अहमदाबाद  महामार्ग दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आमगाव येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री मोटार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता.

खड्डय़ांमुळे २४ तासांत सहा जणांचा मृत्यू ; मुंबई-अहमदाबाद  महामार्ग दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा
(संग्रहित छायाचित्र)

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील आमगाव फाटय़ाजवळ खड्डय़ांमुळे अवघ्या २४ तासांत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळय़ा अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आमगाव येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री मोटार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. तर, मंगळवारी दुपारी अन्य एक मोटार आणि टेम्पोमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला. 

या प्रकरणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखरेख, दुरुस्ती करणारी कंत्राटदार कंपनी आर. के. जैन इन्फ्रा प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक राम राठोड आणि संबंधित अधिकाऱ्यांवर बुधवारी तलासरी पोलीस ठाण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.

पोलिसांची सावध भूमिका..

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली

होती. मात्र, याबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात तातडीच्या उपाययोजनांची सूची देण्यात येणार असून यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीनंतर योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करू, असे पालघर पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पालघर जिल्ह्यात ‘सिकलसेल’चा फैलाव , १२५ रुग्ण; उपचारासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही

संबंधित बातम्या

“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
शिंदे गट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर
जयंत पाटलांच्या चिरंजीवांच्या शाही विवाहाची लगबग! ; दोन लाख लग्नपत्रिका; अतिभव्य मंडप
“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“असे आक्रित इंग्रज काळातही घडले नाही, काळ मोठा…”, संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधानांचाही केला उल्लेख!
“अगदी २५- ३० दिवसांपूर्वी भेट झाली…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट
FIFA World Cup 2022: मेस्सी आणि फर्नांडिसच्या जादुई गोलमुळे अर्जेंटिनाच्या बाद फेरीतील आशा कायम
पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप, इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार, खासदार राजीनामा देणार!
IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारताला आज विजय आवश्यक