Spontaneous participation district anti port march World Fishermen Day November 21 ysh 95 | Loksatta

वाढवण बंदरविरोधी मोर्चात जिल्ह्य़ातून उत्स्फूर्त सहभाग

२१ नोव्हेंबर या जागतिक मच्छीमार दिनाचे औचित्य साधून वाढवण येथील प्रस्तावित बंदराच्या विरुद्ध मंत्रालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात होते.

वाढवण बंदरविरोधी मोर्चात जिल्ह्य़ातून उत्स्फूर्त सहभाग

पालघर : २१ नोव्हेंबर या जागतिक मच्छीमार दिनाचे औचित्य साधून वाढवण येथील प्रस्तावित बंदराच्या विरुद्ध मंत्रालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात होते. या मोर्चात पालघर जिल्ह्यातील किनारट्टीच्या गावांमधील मच्छीमार बांधवांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ लि., ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ (पालघर) आदी संघटनांच्या नेतृत्वाखालील वाढवण बंदराविरोधात आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मत्स्यव्यवसाय विभागात जिल्ह्यातील १० हजारपेक्षा अधिक मासेमारी नौका नोंदणीकृत असून त्यापैकी २०२२ नौका पालघर जिल्ह्यात आहेत. विद्यमान मासेमारी हंगामात ७१३१ नौका कार्यरत असून १२० हॉर्सपॉवर व त्यावरील हॉर्सपॉवर असलेल्या तीन हजारपेक्षा जास्त मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर न केल्यामुळे त्यांनी मासेमारी बंद ठेवली आहे. सागरी क्षेत्र प्रजनन, मत्स्य संवर्धन, जैविक विविधताकरिता तसेच मासेमारीसाठी गोल्डन बेल्ट वाढवण परिसरात आहे. हे क्षेत्र हिरावून पाच लाखांहून अधिक मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचा उदरनिर्वाह हिरावून मच्छीमार, शेतकरी, आदिवासी, डायमेकर यांना देशोधडीला लावणाऱ्या वाढवण बंदरास विरोध करणाऱ्यांसाठी आझाद मैदान मोर्चा आयोजित करण्यात आला होता, या मोर्चाचे आझाद मैदानावर सभेत रूपांतर करण्यात आले.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी पालघर जिल्ह्यातील विविध भागांतून मच्छीमार बांधव व किनारपट्टीच्या गावांमधील ग्रामस्थ रेल्वे, एसटी बस व खासगी वाहनांद्वारे मुंबईकडे गेले होते. यामध्ये सर्व वयोगटांतील नागरिकांचा तसेच विशेषत: महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2022 at 00:02 IST
Next Story
आरोग्य कर्मचारी भरती लवकरच