पालघर जिल्ह्यात सुमारे सव्वाशे सिकलसेलग्रस्त रुग्ण असून एक हजारपेक्षा अधिक सिकलसेल आजाराचे वाहक असल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णांवर उपचारासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा जिल्ह्यात नसल्यामुळे उपचारासाठी मुंबई, गुजरातमध्ये जावे लागत आहे. यामुळे रुग्णाची फरफट होत आहे. आदिवासी भागात या आजाराचा प्रसार आढळून आल्याने जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

सिकलसेल आजार झालेल्या रुग्णांच्या रक्तपेशीमध्ये अनेक गुंतागुंत निर्माण होतात हा आजार आनुवंशिक असल्याने कोणत्या वयोगटाला त्याचा प्रभाव अधिक आढळतो हे अजूनही समजू शकलेले नाही त्यामुळे सर्वसामान्य तपासणीमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांना संशय आलेल्या रुग्णांची तपासणी करून प्रयोगशाळेमार्फत रक्ताचे नमुने व विशिष्ट तपासणीतून या आजाराचे निदान समोर येते जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सरसकट तपासणी करणे शक्य नाही, त्यामुळे हा आजार नक्की कोणाला जडला आहे हे समजणेही कठीण आहे. मात्र ज्या रुग्णाला हा आजार आहे त्याला जोखीम अधिक आहे, अशा रुग्णांना ठरावीक कालावधीत आरोग्य संस्थांनी देखरेखीखाली ठेवणे व वारंवार तपासण्या करणे आवश्यक असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
Cleanliness Survey Nashik Zilla Parishad to Inspect Over 10 thousand Water Sources for Water Quality
नाशिक जिल्ह्यातील १० हजारहून अधिक जलस्त्रोतांची तपासणी

आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य केंद्र ही सिकलसेलसाठी महत्त्वाची ठरतात. मात्र अतिजोखमीच्या व गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना विशेष व्यवस्था केलेल्या रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत. अजूनही जिल्हा रुग्णालय स्थापन झालेले नाही, त्यामुळे सिकलसेल वॉर्डची वानवा आहे. सिकलसेलग्रस्तांना मोफत रक्त देण्याची योजना शासनाची असली तरी अनेक वेळेला पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या रक्तपेढय़ा रक्तपुरवठय़ाबाबत उदासीन धोरण राबवत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला शोधावे लागते किंवा पैसे देऊन रक्त पिशवी विकत आणावी लागते, त्यामुळे रुग्णांची फरफट होत आहे. डहाणू, पालघर, विक्रमगड, वाडा तालुक्यांत या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्याखालोखाल इतर तालुक्यांतही सिकलसेलचे रुग्ण आहेत.

आर्थिक भरुदड
सिकलसेलग्रस्त महिलांना शासकीय व इतर आरोग्य संस्थांमध्ये गर्भजल तपासणी मोफत करून घेण्याची मुभा देण्यात आली असली तरी शासकीय आरोग्य संस्थांमधील ही यंत्रणा ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी कार्यान्वित नसल्याने खासगी ठिकाणी पदरचे पैसे देऊन ही तपासणी करून घ्यावी लागत असल्याचे दिसून आले आहे.

आढळणारी लक्षणे
ताप, छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास, थकवा, अशक्तपणा, निस्तेजपणा, पोटाला सूज येणे, पोटदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, वेदनाशामक गोळयांनी (उदा.प्रोसीन) कमी न होणाऱ्या असह्य वेदना, दृष्टीचा त्रास, नपुंसकता, कमी वयाची सांधेदुखी, अशक्तपणा, निस्तेजपना, दम लागणे, मेंदूतील खंडित रक्तपुरवठयामुळे पक्षपात, असाहाय्य डोकेदुखी अशी आजाराची लक्षणे आहेत.

सिकलसेल आजार म्हणजे काय?
सिकलसेल आजार हा आनुवंशिक व गंभीर स्वरूपाचा असून यामध्ये लाल रक्तपेशी आपला गोल आकार बदलून कोयत्याच्या (अर्धवर्तुळाकार) आकाराच्या होतात. रक्तवाहिन्यामधून शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन व रक्तपुरवठा सहज होत नाही. रक्तपेशी घट्ट आणि चिकट होतात. त्यांचा पुंजका होतो, त्यामुळे गाठी होतात व रक्तपुरवठयामध्ये अडथळा निर्माण होतो. अवयवांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने अवयव निकामी होतात. सांधे दुखतात, संसर्ग होतो. सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी या चाचणीमुळे सिकलसेलवाहक आहे की रुग्ण हे कळते.

सर्वसाधारण औषधोपचार
तज्ज्ञांच्या सल्ल्याने दररोज १ फॉलिक ॲसिड गोळी आयुष्यभर घेणे, हिवतापापासून संनियंत्रणासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळय़ा घेणे, जास्त मेहनतीचे काम करू नये अथवा खेळ खेळू नये, वातावरणानुसार स्वत:ची काळजी घ्यावी, समतोल आहार घ्यावा, दिवसभरातून ८-१० ग्लास पाणी प्यावे.

आजाराचे दोन प्रकार?
रुग्णव्यक्तीला वारंवार जंतुसंसर्ग होतो व वेदना होतात.

ज्या व्यक्तीला सिकलसेलची लक्षणे आढळून येत नाही, परंतु ती व्यक्ती पुढच्या पिढीला सिकलसेल आजार देऊ शकते.

शासनामार्फत योजना
मोफत रक्त व औषधोपचार, मोफत एस. टी प्रवास भाडे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, मोफत गर्भजल परीक्षण तपासणी, सिकलसेल अतिदक्षता वॉर्ड.