पालघरमध्ये मद्यधुंद चालकामुळे एसटी बस दरीत कोसळली; १५ प्रवासी जखमी

रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला. या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

bus accident Palghar
bus accident Palghar : पालघरच्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु

राज्य परिवहन मंडळाची भुसावळ-बोईसर मार्गावरील एसटी बस पालघरच्या वाघोबा खिंडीत उलटी आहे. या अपघातामध्ये किमान १५ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला. या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून भरधाव गाडी चालवणाच्या नादात पालघरच्या आधी वागोबा घाटात बस सकाळी सहाच्या सुमारास दरीमध्ये उलटली. आम्ही कंडक्टरला सांगत होतो की चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. त्याच्या हातामध्ये गाडीचं स्टेअरिंग देऊ नये. तरी कंडक्टरने आमचं न ऐकता चालकाची पाठराखण केली. मात्र चालक फार भयंकर पद्धतीने अगदी वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला, असा दावा या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी केलाय.

या अपघातामध्ये किमान १५ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहे

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St bus accident in palghar 15 injured scsg

Next Story
जिल्ह्यात मुख्याधिकारी पदाच्या ४ जागा रिक्त
फोटो गॅलरी