Premium

पोलीस व जनता एकत्र राहिल्यास प्रदेशात कायद्याचे राज्य कायम राहील; अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांचे प्रतिपादन

समाज माध्यमांवरील एखादी पोस्ट दंगलीला कारणीभूत ठरत असताना समाजातील दुरावा व शांतता बिघडू नये यासाठी समाजाला जागृत व सजग करण्याचे काम महत्त्वाचे आहे.

palghar police stn
पोलीस व जनता एकत्र राहिल्यास प्रदेशात कायद्याचे राज्य कायम राहील; अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांचे प्रतिपादन

पालघर: समाज माध्यमांवरील एखादी पोस्ट दंगलीला कारणीभूत ठरत असताना समाजातील दुरावा व शांतता बिघडू नये यासाठी समाजाला जागृत व सजग करण्याचे काम महत्त्वाचे आहे. समाजाला माहिती देण्याचे काम पोलीस करत असून पोलीस व जनतेचे संबंध महत्त्वपूर्ण आहे. परस्परांमधील असे संबंध कायम राहिले तर प्रदेशात कायद्याचे राज्य कायम राहील असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी पालघर येथे केले.पालघर जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन यांना आयएसओ मानांकन तसेच स्मार्ट पोलीसिंग प्रमाणीकरण झाल्याने त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला प्रवीण साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिंचले हत्याकांडाच्या तपासाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचा दौरा केला असता त्यावेळी विविध पोलीस स्टेशनची असलेली दुरावस्था आपण पहिली होती. गेल्या अडीच- तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचा झालेला कायापालट व स्मार्ट पोलीसिंग चे प्रमाणीकरण ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सध्यस्थितीत पोलीस कोणतीही जबाबदारी झटकू शकत नाहीत असे सांगत पालघर पोलीस दलाने प्रत्येक गावात नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गावातील समस्या जाणून त्या शासनापर्यंत पोहोचवा व त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले.

हेही वाचा >>>पेसा शिक्षक भरती महिनाअखेरपर्यंत; पालघर जिल्ह्याला १३१८ शिक्षक मिळणार

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद अभियानांतर्गत जिल्हा राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या अभियानामुळे जिल्ह्यात टळलेल्या काही अप्रिय प्रसंगांची माहिती दिली. जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकर भरती, पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी केलेली जनजागृती, महिला सक्षमीकरण, नशा मुक्ती, रस्ता सुरक्षा अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, सायबर जनजागृती, सागरी सुरक्षा संदर्भातील व इतर उपक्रमांची माहिती दिली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Statement by additional director general of police praveen salunke on the law in the region palghar amy

First published on: 13-09-2023 at 18:48 IST

आजचा ई-पेपर : पालघर

वाचा