पालघर : पालघर जिल्हा परिषदेचे अंतर्गत असणाऱ्या १० विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी काल ४ जानेवारी रोजी आयोजित केलेली विशेष सभा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या आचारसंहितेच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली.  

जिल्हा परिषदअंतर्गत स्थायी समिती (१४ सदस्य), जलव्यवस्थापन (१२) समिती यांच्यासह शिक्षण, वित्त, आरोग्य, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण अशा १० विषय समितीवर सदस्य निवड होणार असून विषय समित्यांवर नऊ ते १० सदस्य यांची नेमणूक होत असते. या विषय समितीच्या सभासदांच्या निवडीकरिता सभेची नोटीस बजावल्यानंतर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने विषय समिती निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

जिल्हा परिषद नव्याने गठित झाल्यानंतर विषय समितीसाठी निवडणूक होत असते. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा विषय समिती अध्यक्ष यांच्या पदांमध्ये बदल झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक घेण्याची पद्धत आहे. यंदा मात्र पालघर जिल्हा परिषदेत सत्तापालट झाल्यानंतर ज्या इच्छुकांना समिती सभापतीपद मिळाली नाहीत अशांना महत्त्वाच्या विषय समितीमध्ये सामावून घेण्याचे योजण्यात आले होते. मात्र त्यावर एकमत होऊ न शकल्याने ही बैठक तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येते. विशेष म्हणजे आचारसंहितेमुळे सभा स्थगित करण्याचा निर्णय या सभेपूर्वी सदस्यांना कळविणे शक्य होते, मात्र जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या समिती मिळाव्यात यासाठी चढाओढ सुरू असल्याने बैठक स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

..तर रिक्त पदांसाठी निवडणूक

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याला किमान एक तर कमाल दोन समित्यांचे सदस्यत्व मिळणे अपेक्षित असते. पक्षातील सदस्य बळाच्या प्रमाणानुसार विविध समित्यांवर सदस्यांची नेमणूक होते. सद्य स्थितीत बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन विकास आघाडी हे पक्ष सत्तास्थानी आहेत. विषय समिती सदस्यांसाठी सर्व पद नव्याने भरण्याबाबत एकमत न झाल्यास कायद्याप्रमाणे फक्त रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.