वाइनसाठी दर वर्षी दोन लाख किलो फळांचा वापर, फळप्रक्रिया, निर्यातीवर मर्यादा

नीरज राऊत

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Gutkha worth 21 lakh seized at different places in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त

पालघर: वाइन विक्रीसंदर्भात सध्या राज्यात वादंग उभा राहिला आहे. मात्र या वाइन पालघर जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर जिल्ह्यातील वाइन उत्पादन फलोत्पादकांसाठी पूरक आहे, असे सांगितले जाते. जिल्ह्यातील एकमेव वायनरी अर्थात वाइन उत्पादन केंद्रामध्ये दर वर्षी किमान दोन लाख किलो फळांचा वापर होतो. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात फळ उत्पादन होत असताना  फळप्रक्रिया व फळाच्या निर्यातीवर मर्यादा असल्याचे दिसून आले आहे.

घोलवड-बोर्डी येथील गेल्या काही वर्षांपासून वाइन उत्पादन सुरू आहे. या उद्योगामध्ये चिकूसह आंबा, अननस, कम्रक, स्ट्रॉबेरी, जांभूळ तसेच गुलाब पुष्प व मधापासून वाइन उत्पादन केले जात आहे. प्रति लिटर वाइनसाठी एक किलो फळाची आवश्यकता भासते. राज्य सरकारने सन २०१७ व २०१९ मध्ये बदललेल्या वाइन धोरणामुळे द्राक्ष व अन्य फळांपासून तयार होणाऱ्या वाइन समान उत्पादन शुल्क आकारण्यात आला आहे. लघुउद्योगांना वाइन उत्पादनाच्या परवाना शुल्कामध्ये आकर्षक सवलत देण्यात आली आहे. फक्त वाइन बारची उभारणी करायची झाल्यास त्यास अकृषक जागेची आवश्यकता भासणार नाही. एकंदरीत  कृषी पर्यटनाला वाइनची जोड  पाहता या उद्योगाला चालना मिळाली आहे. जिल्ह्यात चिकू, आंबा, काजू, पेरू, जांभूळ, जांभ अशा विविध प्रकारचे फलोत्पादन होते.  तरीही प्रक्रिया किंवा फळांची निर्यात करण्यासाठी अनेक मर्यादा आहेत.  घरगुती वापरासाठी गरीब व मध्यमवर्गीय घरांमध्ये अजूनही फळाचा अपेक्षित प्रमाणात वापर होत नाही. त्यामुळे फलोत्पादनाला वाइन उद्योग पूरक ठरेल, अशी भावना येथील शेतकऱ्यांची आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तसेच गट शेती करणाऱ्या समूहाला घरगुती पद्धतीने किंवा लघु उद्योग स्वरूपात वाइन उत्पादन करण्याची मान्यता मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.

आंब्यासह वेगवेगळय़ा फळांच्या रसामध्ये प्रत्यक्षात फळांचा अंश १० ते २० टक्के इतकाच असतो. तसेच कॅनिंग प्रक्रियेत दुय्यम दर्जाच्या फळाची अधिक प्रमाणात खरेदी होताना दिसत असते. मात्र वाइन उत्पादनासाठी १०० टक्के चांगल्या दर्जाच्या फळाचा वापर होत असतो. वाइन उत्पादन करताना फळावर कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करावी लागत नाही. इतर मद्य उत्पादनांच्या तुलनेत वाइन उत्पादनात ऊर्जावापर कमी आहे. त्यामुळे या वाइन उत्पादन धोरणात बदल केल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते लाभदायक ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.

फळप्रक्रिया मर्यादित

भौगोलिक मानांकन मिळालेल्या घोलवड येथील चिकू फळाच्या चकत्या, पावडर तयार करून त्यापासून चिकू शेक, चिकू चॉकलेट्स, चिकू आइस्क्रीम, चिकू बर्फी असे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. मात्र किलगड, जांभूळ, काजू, अननस, केळी, पेरू, पपई या जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांवर प्रक्रिया करण्याचा कोणताही प्रकल्प जिल्ह्यात सध्या कार्यरत नसल्याने बाजारात मिळेल त्या दराने शेतकऱ्यांना फळांची विक्री करावी लागते. किंबहुना सध्या नाशिक व परिसरातील अनेक बागायतदार त्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या फळांची थेट विक्री करण्यासाठी पालघर जिल्ह्यात येताना दिसून येत आहेत.

औषधी वापरासाठी द्राक्षासवसारख्या औषधात सहा ते दहा टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. वाइनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जवळपास तितकेच असते. वाइन उत्पादनादरम्यान फळाचे मूल्यवर्धन होत असून वाइनचा वापराचा कार्यकाळ (शेल्फ लाइफ) इतर फळप्रक्रिया प्रकारापेक्षा अधिक असल्याने उपलब्ध होणाऱ्या फळांची खरेदी करून वाइन तयार करून ठेवणे सहज व सोपी गोष्ट आहे. फलोत्पादनासाठी वाइन उद्योग पूरक असताना वादंग अनावश्यक आहे.

– प्रियंका सावे, संचालिका हिल झील वाइन प्रायव्हेट लिमिटेड, बोर्डी