वाडा: आज बुधवारी दिड दिवसाचे गणपती विसर्जन करताना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोनसई येथे दोन तर गो-हे येथे एकजणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.कोनसई येथे वैतरणा नदीमध्ये गणपती विसर्जन करताना संध्याकाळी साडेसहा वाजता जगत नारायण मौर्य  (वय ३८) सूरज नंदलाल प्रजापती (वय २५) या दोन परप्रांतीयांचा बुडून मृत्यू झाला. ते येथील प्रेम रतन या कंपनीत कामगार म्हणून काम करीत होते. त्यांनी दिड दिवसीय गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. मुळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या या दोन्ही गणेश भक्तांना गणपती विसर्जन करताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. तर दुसऱ्या घटनेत गो-हे येथे एका तलावात गणपती विसर्जन करताना एकाचा मृत्यू झाला त्याचे नाव प्रकाश नारायण ठाकरे असून  दोघांचे मृतदेह सापडले आहेत असे वाडा पोलिसांनी सांगितले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people drowned in wada during ganesh idol immersion zws