पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत ट्रेलर घसरून अपघात

गुजरातच्या दिशेने जाणारा ४० फुटी ट्रेलर खिंडीतून वळण घेत असताना चिखलावर घसरला व रस्त्यावर आडवा झाला.

Trailer accident Mendhwan khind
पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत ट्रेलर घसरून अपघात (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पालघर : मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारा ट्रेलर मेंढवन खिंडीत पावसामुळे घसरून महामार्गावरच आडवा झाला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मेंढवन खिंडीत ‘एमएमआरडीए’च्या पाईपलाइनच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती पडलेली आहे, त्यातच आज सकाळी पाऊस पडल्याने महामार्गावर चिखल होऊन रस्ता निसरडा झाला. गुजरातच्या दिशेने जाणारा ४० फुटी ट्रेलर खिंडीतून वळण घेत असताना चिखलावर घसरला व रस्त्यावर आडवा झाला.

हेही वाचा – पालघर: कनिष्ठ झिंबाब्वे संघाचा सफाळ्यात सराव

हेही वाचा – अवकाळी पावसामुळे साडेसात कोटींचे नुकसान, नुकसानभरपाईचे सर्वेक्षण अद्याप सुरूच

या अपघातामुळे महामार्गाच्या तिन्ही लेन बंद झाल्या. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागल्या. महामार्ग पोलीस, तसेच महामार्गाची देखभाल करणाऱ्या कंपनीने जवळपास दीड तासांमध्ये ही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले व वाहतूक सुरळीत झाली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 12:12 IST
Next Story
अवकाळी पावसामुळे साडेसात कोटींचे नुकसान, नुकसानभरपाईचे सर्वेक्षण अद्याप सुरूच
Exit mobile version