कासा : दापचरी सीमा तपासणी नाका आणि क्षेत्रीय परिवहन नाका येथे गुजरातकडून येणाऱ्या वाहनांची, अधिक वजनाची (ओव्हरलोड) वाहने, गाडीची कागदपत्रे व इतर प्रकारची तपासणी केली जाते. नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड वाचवण्यासाठी ओव्हरलोड आणि कागदपत्रे अपूर्ण असलेली वाहने तलासरी, उधवा, धुंदलवाडी तसेच तलासरी, उधवा, सायवन चारोटी या मार्गे तपासणी नाके चुकवत महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असून त्यामुळे हे मार्ग म्हणजे अवैध वाहतुकीचे मार्ग बनले आहेत. या रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावर वाहनांमध्ये असलेल्या मालाचे वजन करणे, नियमानुसार वाहनचालकांकडे गाडीतील मालाचे अधिकृत बिले तपासली जातात. तसेच चुकीच्या पद्धतीने मालवाहतूक होत असेल तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाते. तर दापचरी येथील क्षेत्रीय परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ चेक पोस्ट) तपासणी नाक्याद्वारे ओव्हरलोड वाहने (जादा भार), वाहनांना ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त उंची, रुंदी असलेला माल भरलेली वाहने यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. ओव्हरलोड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात तसेच रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे ओव्हरलोड वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो. वाहने ओव्हरलोड असतील तर २२ हजार ते ४० हजारापर्यंत दंड आकारला जातो. तर एक टनासाठी २२,००० रुपये, दोन टनासाठी २३००० रुपये, तीन टन असेल तर २६,००० हजार रुपये आणि पुढील प्रत्येक टनासाठी ४००० रुपये प्रतिटन अतिरिक्त दंड आकारला जातो. त्यामुळे ओव्हरलोड वाहने हा दंड वाचवण्यासाठी सीमा तपासणी नाका आणि क्षेत्रीय परिवहन तपासणी नाका टाळण्यासाठी आपली वाहने तलासरी-उधवा -धुंदलवाडी आणि तलासरी – उधवा-सायवन – चारोटी या मार्गे आपली वाहने नेतात. त्यामुळे सीमा तपासणी नका, आणि क्षेत्रीय परिवहन तपासणी नाका यांचे दंड वसूल न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

हेही वाचा – पालघर : वाढवण बंदर संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निष्फळ

रात्रीच्या वेळी ही वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. एकीकडे दंड न भरल्यामुळे शासनाचे नुकसान तर होतच आहे. तर दुसरीकडे ही वाहने तलासरी उधवा धुंदलवाडी, तलासरी- उधवा-सायवन-चारोटी या रस्त्याने जात असल्याने या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावर चालणाऱ्या ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे तलासरी, उधवा, धुंदलवाडी, सायवन या भागातील नागरिकांना या रस्त्याने आपली वाहने चालवणे त्रासदायक झाले आहे.

मोठं मोठी ट्रेलर सारखी वाहने या रस्त्याने जात असल्याने अपघाताचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. ही चोरट्या पद्धतीने होणारी वाहतूक तात्काळ थांबवली जावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात असून याबाबत राज्य मार्ग पोलीस तसेच स्थानिक पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दापचरी येथील सीमा तपासणी नाका आणि आरटीओ चेक पोस्ट चुकवण्यासाठी ओव्हरलोड वाहने तलासरी उधवा सायवन चारोटी, तलासरी उधवा धुंदलवाडी मार्गे जातात. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अपघात ही होत आहेत. तरी या भागातून होणाऱ्या अवैध वाहतूक रोखण्यासाठी आरटीओ आणि पोलीस खात्याला पत्र दिली आहेत. तरी या वाहनांवर कारवाई केली जावी. – काशिनाथ चौधरी (जिल्हा परिषद, सदस्य)

हेही वाचा – शहरबात : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचे हंगाम

दापचरी येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाते. परवानगीपेक्षा जास्त वजन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. परवानगीपेक्षा जास्त वजन असेल तर एक टनांपर्यंत २२,००० हजार, दोन टन असेल तर २३,००० हजार आणि तेथून पुढील प्रत्येक टनासाठी ४००० प्रतिटन दंड आकारला जातो. त्यामुळे वाहतूक नियम मोडणारी वाहने तलासरी-उधवा-कासा, तलासरी-उधवा-धुंदलवाडी या मार्गाचा वापर करतात.

लोकसत्ता बातमीचा परिणाम

दापचरी तपासणी नाक्यावरून अतीअवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत लोकसत्तामध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी “अतीअवजड वाहतूक सुसाट” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अतीअवजड वाहनांचा आडमार्गाने प्रवास सुरू झाला आहे. यामुळे आंतरिक रस्त्यांची दुर्दशा होत असून शासनाचा मोठा महसूल बुडवला जात आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागासह स्थानिक पोलिसांनी देखील कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transport of cargo vehicles through udhwa kasa to avoid penalty at border check post at dapchari ssb
First published on: 13-02-2024 at 19:09 IST