लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला बंद असणाऱ्या फाटक ओलांडताना दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात एक सहकारी बचावला असून त्याला दुखापत झाली आहे.

PSI from Pune commits suicide by hanging in Lonavala
पुण्यातील पीएसआयची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना
Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना

बोईसर पूर्वेला एका उद्योगात वेल्डिंग व इतर काम करणारे बिहार राज्यातील मोतीयारी जिल्ह्यातील तीन तरुण सुट्टी निमित गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघर शहरात आले होते. पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना उपनगरीय गाडी आल्याने दोन रुळाच्या मध्ये असणाऱ्या जागेत तिघांपैकी दोघे थांबून राहिले. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आणखी वाचा-पालघर : वलसाड डबल डेकर डब्यांचे भवितव्य रेल्वे बोर्डाच्या हाती

रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पालघरच्या माजी नगरसेविका लक्ष्मीदेवी हजारी यांनी दिली असून या तिघांपैकी एक तरुण लघुसंखेसाठी बाजूला गेल्याने अपघातात जखमी झाला. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मृतांचा नावाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. काही दशकांपासून पालघर रेल्वे फाटक बंद करण्यात आले असले तरीही पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे फाटक ओलांडून शेकडो नागरिक पूर्व पश्चिम प्रवास करणे भाग पाडत आहे.

बंद रेल्वे फाटक अंधारात ओलांडताना जयपुर एक्सप्रेस ने धडक दिलेल्या दुर्घटनेतील मृतांची नावे : सोनुराम अंदाजे (३५) मोनुकुमार (१९)  जखमी: अनुप पंडित (२०)

Story img Loader