मिशन कवच-कुंडलअंतर्गत दोन लाख लसीकरण ; पालघर जिल्ह्य़ाचा लसीकरणाचा २३ लाखांचा टप्पा पार

लसीकरणात १८ ते ४५ वयोगटातील एक लाख ५० हजार ८९३ नागरिकांचा समावेश आहे.

पालघर जिल्ह्य़ाचा लसीकरणाचा २३ लाखांचा टप्पा पार

पालघर : जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या मिशन कवच-कुंडल या योजनेअंतर्गत आठवडाभराच्या अवधीत जिल्ह्यामध्ये दोन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी एक लाख ३८ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा २३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात राबविण्यात आलेल्या मिशन कवच-कुंडल या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ९०० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी एक लाख ५८ हजार ४४० नागरिकांनी लशीची पहिली मात्रा, तर ४४ हजार ४५४ जणांनी लशीची दुसरी मात्रा घेतल्याचे दिसून आले आहे.

लसीकरणात १८ ते ४५ वयोगटातील एक लाख ५० हजार ८९३ नागरिकांचा समावेश आहे. त्याचबरोबरीने ४५ ते ६० या वयोगटातील ३६ हजार ५६ तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या १५ हजार ३४० नागरिकांचे लसीकरण या मोहिमेमध्ये पूर्ण करण्यात आले. लसीकरणाच्या या विशेष मोहिमेत पालघर तालुक्याने सर्वाधिक ३९ हजार ३७९ लसीकरण केल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात झालेल्या २३ लाख २१ हजार नागरिकांच्या लसीकरणांपैकी १७ लाख २२ हजार नागरिकांची पहिली मात्रा, तर सुमारे सहा लाख जणांची दुसरी मात्रा  झाली आहे. अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागांत काही ठिकाणी लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

जिल्ह्यात सर्वत्र व्यापक संवाद लसीकरण हाती घेण्यात आली आहे. शहरी भागांतील बहुतांश नागरिकांची लशीची पहिली मात्रा पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे.

जिल्ह्यातील लसीकरण

क्षेत्र                लसीकरण

* डहाणू              ३३६९४

* जव्हार                    ९३६२

* मोखाडा            ४८८७

* पालघर            ३९३७९

* तलासरी            २८१०

* वसई ग्रामीण        ९५७१

* विक्रमगड           ८८६९

* वाडा               १२७७९

* एकूण पालघर ग्रा     १२१३५१

* विविएमसी          ८१५४९

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two lakh vaccinations under mission kavach kundal zws

ताज्या बातम्या