वैतरणा नदी पात्रात दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू | two youth died to drowning in Vaitarna river at wada taluka | Loksatta

वैतरणा नदी पात्रात दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा शुक्रवारी (४ नोव्हेंबर) संध्याकाळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

वैतरणा नदी पात्रात दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
वैतरणा नदी पात्रात दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

वाडा तालुक्यातील आवंढे येथील वैतरणा नदीच्या पात्रातील चाचू बंधारे येथे दोन तरुण अंघोळीसाठी गेले असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा शुक्रवारी (४ नोव्हेंबर) संध्याकाळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह आज शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर वाडा पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सुनील बाबू डिके (३० वर्षे), व कार्तिक जानू कोदे (१७ वर्षे) असे नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव असून ते ठाणे येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा… ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येईल’; चंद्रकांत पाटलांचा विश्वास

हेही वाचा… ठाणे: भांडण सोडवायला गेला असता चाकू हल्यात मृत्यू

हे दोन्ही तरूण शुक्रवारी (४ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आवंढे येथील वैतरणा नदीच्या पात्रातील चाचुचा बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेले असताना नदीच्या पात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले. तरुण पाण्यात बुडाल्याची आरडा ओरड झाल्याने स्थानिकांनी एका तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला, त्याला तात्काळ नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृत दोन्ही तरुण ठाणे येथुन आवंढे येथे आपल्या नातेवाईकांकडे आल्याची माहिती पुढे आली आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-11-2022 at 16:22 IST
Next Story
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सोमवारी सर्वसाधारण सभेत रंगीत तालीम