पालघर: गुजरात राज्यातील भाजपाचे लोक पालघर मध्ये येऊन बसले असून ते जिल्ह्यातील निवडणूक प्रचारावर नियंत्रण ठेवत आहेत. ही मंडळी शेव-ढोकळा घेऊन आली आहेत का असा सवाल करत आपली बॅग तपासली जात असताना गुजरात मधील प्रचारकांकडे प्रशासन लक्ष का देत नाही असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथील सभेत उपस्थित केला.

लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यात दाखल झालेल्या गुजरातच्या लोकप्रतिनिधी व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील निवडणूक प्रचारावर नियंत्रण ठेवले जात असल्याकडे लक्ष वेधून जिल्ह्यातील मराठी माणूस मेला आहे का? लाचारी का पत्करता ? असे सवाल उपस्थित केले. वेगवेगळ्या नेतेमंडळींच्या बॅगा तपासल्या जात असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॅग तपासली गेली नसल्याचे त्यांनी सांगून त्यांच्या बॅगेत नुसत्या थापा असतील असे त्यांनी सांगितले. हेलिपॅड वर त्यांच्या बॅगा तपासण्याचे वेळी आपण गुजरातचे अधिकारी आहात का अशी त्यांनी खोचकपणे विचारणा केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
Girish Kuber Explanation About Gurdian Minister Post
Video : पालकमंत्री पदासाठी एवढी साठमारी का होते? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण

हेही वाचा >>>मुरबे बंदर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार रॅलीला काळे झेंडे

ही निवडणूक आपण हरलो तर पालघरच्या जनतेवर वाढवण व मुरबे येथील बंदर लादले जाईल असे सांगत महाविकास आघाडी सत्तेत आल्यास वाढवण व मुरबे बंदर प्रकल्प रद्द केला जाईल असे सांगितले. अदानी आपले कोणी लागत नाही असे सांगत लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नका असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

पालघर जिल्हा हा वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून जिल्ह्याच्या किनारपट्टीचे पर्यटनासाठी विकसीत करणे तसेच जव्हार सारख्या डोंगरी भागात थंड हवेचे ठिकाण (हिल स्टेशन) विकसित करणे शक्य असल्याचे सांगितले. पालघर मध्ये विमानतळ उभारणे आवश्यक असून पालघर जिल्ह्यासाठी विकास आराखडा आपल्या मनात असल्याचे त्यांनी प्रचार सभेत सांगितले. आपण विकासाच्या विरुद्ध नसून जिल्ह्याचा विनाश होऊ देणार नाही असे त्यांनी पुढे सांगितले.

हेही वाचा >>>पालघर : विक्रमगड विधानसभेतील शिवसेना बंडखोरीमुळे पालघरमधील महायुतीत वादाची ठिणगी

राज्याच्या किनारपट्टीला धोका असून क्लस्टर डेव्हलपमेंट च्या नावाखाली कोळीवाडे उध्वस्त केले जातील अशी भीती व्यक्त करत सत्तेत आल्यानंतर यासंदर्भातील आदेश फाडून टाकू असे त्यांनी सांगितले. स्व. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर त्यांचा कसा वापर केला हे आपण सर्व जाणता असे सांगत भाजपा ही वापरा आणि फेका पद्धतीचा अवलंब करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची पुन्हा तपासणी

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पालघर आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि डॉ. विश्वास वळवी यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथील खैरापाडा मैदानावर जाहीर सभा घेतली. बोईसर येथील नियोजित सभेसाठी उद्धव ठाकरे हे तब्बल दोन ते अडीच तास उशिरा पोहोचले. उद्धव ठाकरे यांचे साडे वाजे साडेचार वाजेच्या दरम्यान हेलीपॅड वर आगमन झाले. यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची पुन्हा तपासणी करण्यात आली. यावेळी निवडणुकीदरम्यान राज्यात गुजरातची खूप माणसे फिरत असून तुम्ही पण गुजरातची माणसे तर नाही ना असा मिश्किल टोला उद्धव ठाकरे यांनी बॅगेची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगावला.

Story img Loader