पालघर: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. अनेक डॉक्टर्स गैरहजर असल्याने आरोग्य व्यवस्थेला खीळ बसली आहे. तर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असल्यामुळे ते मानसिक तणावाखाली आहेत.
पालघर जिल्हा शल्यचिकित्सक अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये १२ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये यांवर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची मदार आहे. याचबरोबरीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंतर्गत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहेत. मात्र जे उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात होत नाहीत त्यासाठी ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारांसाठी जावे लागते. दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्ण येतात. परंतु येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे अतिरिक्त डॉक्टरांवर रुग्णसेवेचा ताण पडतो. बाह्यरुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग, दररोज येणाऱ्या रुग्णांची आरोग्य तपासणी यासह आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या रुग्णांवर उपचार, गरोदर महिलांची तपासणी, प्रसूती, बालकांची तपासणी, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची तपासणी, लहान मध्यम शस्त्रक्रिया अशा अनेक कामांची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. मात्र त्यासाठी पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. अनेकदा संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर येते. अशा वेळी संबंधित अधिकाऱ्यावर प्रचंड तणाव असतो.
पालघर जिल्ह्यातील १२ आरोग्य संस्थांमध्ये सुमारे ६० वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ पदे आजही
रिक्त आहेत. रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी पाच ते सहा वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहतात. त्यामुळे रुग्णसेवेत अनेक अडचणी येतात. आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात असले
तरी मनुष्यबळाची कमतरता आहेच. यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच खीळ बसते आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे.
फक्त वैद्यकीय अधिकारीच नव्हे तर संपूर्ण रुग्णालय चालवणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांचीही कमतरता आहे. सुमारे नऊ वैद्यकीय अधीक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता
इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधीक्षकांवर इतर रुग्णालयांच्या कामाचा भार देण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी व अधीक्षकांअभावी, पालघर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खिळखिळी होत आहे.
पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दिनकर गावित हे एप्रिलअखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने आणखीन एक पद रिक्त होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या समकक्ष असलेल्या या रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेची दाणादाण उडणार आहे. प्रशासनाने याकडे वेळेवर लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
कारवाई नाही
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हजर झालेल्या मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत, मात्र अनेक दिवस होऊनही त्यावर कार्यवाही नाही.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरची कमतरता असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे. जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य व्यवस्था याच कर्मचाऱ्यांच्या बळावर उभी आहे. डॉक्टरांची रिक्त पदे ही अत्यंत गंभीर समस्या आहे. तिची मागणी करून पूर्ततेसाठी पाठपुरावा केला जाईल. – राजेंद्र गावित, खासदार, पालघर जिल्हा

Thane district, schools are now tobacco free, health departments, students
ठाणे जिल्ह्यातील ९३६ शाळा तंबाखूमुक्त
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित
Municipal Corporation will fill the contract semi-medical staff on a temporary basis
महानगरपालिका तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी निमवैद्यकीय कर्मचारी भरणार