scorecardresearch

Premium

पालघर: भूकंपाच्या धक्क्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात सतर्कता

ओएनजीसी तेल विहिरी व वसई तालुक्यातील किनाऱ्याच्या दरम्यान या भूकंपाचे केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता ३.८ रिचशर स्केलवर नोंदवण्यात आली आहे.

earthquake, Vigilance in the palghar district , earthquake shock,
भूकंपाच्या धक्क्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात सतर्कता ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या समोर सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला असून त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व विशेषता समुद्रकिनारी असणाऱ्या अधिकारी वर्गाला सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ओएनजीसी तेल विहिरी व वसई तालुक्यातील किनाऱ्याच्या दरम्यान या भूकंपाचे केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता ३.८ रिचशर स्केलवर नोंदवण्यात आली आहे. समुद्रामध्ये झालेल्या भूकंपामुळे वसई अथवा पालघर तालुक्यात कंप जाणवला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

mahavitaran
पावसाच्या तडाख्यात महावितरणला ४५ लाखांचा फटका; अडीचशे मीटरमध्ये पाणी अन..
nashik district rain, nashik dams, dams in nashik, 83 percent water storage in dams, nashik dams 83 percent water storage
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर; १४ धरणांमधून विसर्ग
mumbai rains heavy showers in mumbai area heavy rain In mumbai
मुंबई परिसरात जोरदार सरी
imd predicts moderate rain with thunder in Maharashtra,
आज विजांच्या कडकडाटासह पाऊस, यात तुमचा जिल्हा तर नाही…?

हेही वाचा >>>दिड दिवसाचे गणपती विसर्जन करताना वाड्यात तीनजण बुडाले

या भूकंपाच्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधून सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भूकंपामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये समुद्री लाटांच्या तीव्रतेमध्ये बदल झाला नसल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vigilance in the palghar district from the point of view of earthquake amy

First published on: 22-09-2023 at 19:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×