वाडा:   सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या कुडूस येथील वार्षिक बाजाराला सोमवारपासून सुरुवात झाली. परिसरातील ५२ गावांना अधिक फायदेशीर असणारा हा १५ दिवसांचा वार्षिक बाजार गरिबांचा मॉल म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यातील चार महिने साठवणीचा किराणा सामान या बाजारातून खरेदी केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोटी, सिन्नर, नाशिक, अहमदनगर येथील व्यापारी या बाजारात मोठय़ा प्रमाणावर किराणा सामान विक्रीसाठी आणत असतात. स्थानिक दरापेक्षा १० ते १५ टक्के कमी दर असल्याने या वार्षिक बाजारात ग्राहाकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. पावसाळ्यापूर्वी घरगुती पद्धतीने करावे लागणाऱ्या मसालेसाठी विविध प्रकारची मिरची, कांदे, लसून, खोबरे, कडधान्य अशा विविध वस्तुंची खरेदी  बाजारातून केली जाते. वार्षिक बाजारातील  मालाचे भाव  ठरविण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन एक समिती स्थापन करून दर निश्चित करते.  सोमवारी या समितीची बैठक होऊन या वार्षिक बाजारातील काही निवडक वस्तुंचे दर ठरविण्यात आले. कुडूस वार्षिक बाजारात ग्राहकांनी माल खरेदी करताना बाजार भावाची खात्री करूनच माल खरेदी करावा. बाजारभावात काही तफावत आढळल्यास ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी अनुरुद्ध पाटील यांनी केले आहे यावेळी करण्यात आले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers buy groceries items from annual market in kudus zws
First published on: 25-05-2022 at 00:25 IST