नितीन बोंबाडे
सन १९३२ पासून मागणी असलेल्या डहाणू ते नाशिक असा १५५ कि.मी. चां रेल्वे मार्ग प्रस्ताव संबंधी केंद्रीय रेल्वे मंत्री अष्टिद्धr(२२८)नी वैष्णव यांना दिल्ली येथील कार्यालयात, भेटून भौगोलिक विकास घडवून मंजूर करणें बाबत निवेदन देण्यात आले. रेल्वे मंत्री आष्टिद्धr(२२८)न वैष्णव यांनी डहाणू नाशिक रेल्वे मार्गासाठी २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने रेल्वे मार्ग प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. डहाणू ते नासिक रेल्वे मार्गाचे महत्व आणि भौगोलिक माहिती पटवून दिली असता याबाबत पुनर्विचार करण्याची आश्वसन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन १९३२ मध्ये ब्रिटीश सरकारच्या राजवटींत डहाणू ते नाशिक रेल्वे मार्गाची मागणी आहे. या मार्गात डहाणू ते नाशिक १५५ कि.मी. अंतराच्या पट्टया पालघर, ठाणे, नाशिक असे तीन जिल्ह्यंत मोडत असून मुंबई नजिक असल्याने, मुंबईकरांनाही दळणवळणासाठी दिलासा मिळेल. यावेळी पालघर जिल्हा भाजप गुजराती सेलचे अध्यक्ष भविन पारेख, कार्यालय सचिव हरेश मर्दे, दिनेश मर्दे, आकाश सिंग उपस्थित होते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waiting for dahanu nashik railway since pre independence era amy
First published on: 23-09-2022 at 00:02 IST