साडेनऊ लाखांत शौचालयाची उभारणी; कामाची पडताळणी न करता मोबदला

नीरज राऊत

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

पालघर : पर्यटन विकासाच्या नावावर जिल्ह्यातील दुर्गम भागात  शासकीय निधीची लूट सुरू असल्याचे उघडकीस येऊ लागले आहे.  जिल्हा परिषदेने मोखाडा तालुक्यातील ओसरविरा या पर्यटन स्थळी बांधलेल्या शौचालयावर तब्बल  (स्वच्छतागृह)  नऊ  लाख ८६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून यामध्ये सुमारे साडेसात लाख रुपयांचा निधी कामाची योग्य पडताळणी व खातरजमा न करता अदा करण्यात आला असल्याचे दिसून आले आहे.

सन २०१८-१९ अंतर्गत ३,४५२ शीर्षकांतर्गत पर्यटन विकासासाठी ओसरविरा पर्यटन स्थळी शौचालय (स्वच्छतागृह)  बांधण्यासाठी जून २०१९ मध्ये नऊ लाख ८६ हजार रुपयाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता देण्यात आली होती.  यामध्ये शौचालय उभारण्यासह परिसरातील विकासाच्या काही कामांचा समावेश असल्याचे तांत्रिक मान्यता आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये मंदिरावर पत्र्याच्या शेडची उभारणी करणे तसेच मंदिर व लगत असणाऱ्या कुटीर दरम्यानच्या मोकळय़ा जागेत पेवर ब्लॉक बसवण्याची कामांचा समावेश होता. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची संपर्क साधला असता नऊ  लाख ८६ हजारमधून कर व इतर तांत्रिक खर्च वगळून आठ  लाख ७६ हजार रुपयांचा खर्च प्रत्यक्ष कामासाठी अपेक्षित होता. मात्र त्यामध्ये काटछाट करून सात लाख ३० हजार रुपये अदा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

प्रत्यक्षात करण्यात आलेल्या कामाच्या देयकाच्या तपशिलाची मागणी केली असता या संदर्भात बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करताना दिसून आले. तरीदेखील पेवर ब्लॉक बसवण्यासाठी अंदाजे पाच लाख रुपये उर्वरित खर्च शौचालय व मंदिरावरील पत्रे उभारण्यासाठी खर्च झाल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकाराची मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले तरीही स्थानीय लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्यांनी याविषयी मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माधव संखपाळे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित प्रकरणात प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्यात येईल असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला  सांगितले. 

पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी पाच लाख रुपये?

मंदिराजवळ असणाऱ्या ४७५ चौरस मीटर मोकळय़ा जागेत पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी पाच लाख रुपयांचे खर्च झाल्याचे सांगण्यात येते. ब्लॉक अंथरण्यापूर्वी त्याखाली काँक्रीटीकरण करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात   सुमारे २६० चौरस मीटर क्षेत्रफळावर मातीच्या जमिनीवर भुकटी (ग्रीट पावडर) पसरून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे स्थानिक हिरामण कोरडे यांनी  सांगितले.  अशा पद्धतीने पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी बाजारामध्ये ११०० ते  १३०० रुपये प्रति चौरस मीटर दर असताना या कामात झालेला गैरव्यवहार झाले असून स्थानिक अभियंता यांनी दुर्लक्ष केले आहे.

बांधकामावरील खर्च अपेक्षेपेक्षा जास्त

लोखंडी कैची व पत्रे मंदिराच्या कौलांवर बसवण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपशिलानुसार शौचालय बांधण्यासाठी किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. शासनाकडून शौचालयासाठी देण्यात येणाऱ्या २० हजार रुपयांच्या खर्चापेक्षा झालेला खर्च काही पटीने असून इतक्या खर्चात किमान दोन घरकुलांची उभारणी झाली असती असे सांगितले जात आहे.