scorecardresearch

Premium

जलजीवन मिशन युद्धपातळीवर ; जिल्ह्यातील साडेचार लाख घरांत मार्च २०२४ पर्यंत पाणीपुरवठा

यापैकी ग्रामीण भागातील ५६५ योजना या जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणार असून ११२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

jal jeevan mission in palghar,
(संग्रहित छायाचित्र)

पालघर : पालघर जिल्ह्यातील सर्व साडेचार लक्ष घरांना मार्च २०२४ पर्यंत घरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणी योजना अमलात आणण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने युद्धपातळीवर नियोजन व अंमलबजावणी सुरू केली आहे. अधिकांश योजनेची मंजुरी प्राप्त असून कामाचे कार्यादेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील ८९९ गावांमध्ये ५९१ नळ पाणी योजनांद्वारे सन २०५३ पर्यंत अपेक्षित असणाऱ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आखणी सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ तर शहरी वस्तीतील नागरिकांना ७० लिटरप्रमाणे अपेक्षित लोकसंख्येच्या आधारे सुधारित योजना तयार करण्यात येत आहेत. यापैकी ग्रामीण भागातील ५६५ योजना या जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणार असून ११२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

hearing regarding Zendepar iron mine
झेंडेपार लोहखाणीसंदर्भातील सुनावणीसाठी नागपुरचा नेता सक्रिय!
development tribals near Mumbai
विश्लेषण : मुंबईलगतच्या भागातील आदिवासींसाठी विकासाची वाट बिकटच का ठरते?
Potholes on roads in Thane
ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे
increase in lumpi akola
अकोल्यात ‘लम्पी’ प्रादुर्भावात सातत्याने वाढ; १० कि. मी. क्षेत्रामध्ये…

दर माणशी ५५ लिटर पाणी देण्याचे निश्चित झाल्याने कालबाह्य असणाऱ्या किंवा पंधरा वर्षांपेक्षा अधिक कार्यरत असणाऱ्या योजनांची सुधारणात्मक पुनर्रचना हाती घेण्यात येणार आहे.  

सध्या अस्तित्वात असणाऱ्या २८० गावांमधील २०८ नळ पाणी योजनांची सुधारणात्मक पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामध्ये नवीन जलस्रोत निर्माण करणे, नव्याने जलवाहिनी टाकणे, बंद पडलेल्या योजनांची दुरुस्ती करणे, वाढीव पाइपलाइन टाकणे तसेच बिघडलेल्या, जळालेल्या उपकरणांची दुरुस्ती करणे किंवा वाढीव क्षमतेची उपकरणे बसविण्याचे प्रस्तावित आहे. याखेरीज ४५३ गावांसाठी ३८६ नवीन योजना आखण्यात येत आहेत. ७३३ गावांची आगामी काळातील पाण्याची सुविधा जिल्हा परिषद करत असून इतर निमशहरी व शहरी भागातील योजना, नागरी भागातील काही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली उभारल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या ५६५ योजनांपैकी ५३९ योजनांचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यापैकी ५०३ योजनांना जिल्हा पाणीपुरवठा देखरेख व्यवस्थेकडून परवानगी देण्यात आली आहे. या योजनांपैकी ४३७ योजनांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून १४२ योजना काम करण्याचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) संबंधित ठेकेदारांना देण्यात आले आहेत. इतर नळ पाणी योजनांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू असून पावसाळा संपल्यानंतर या कामांना आरंभ होईल, असे पालघर जिल्हा परिषदेमार्फत सांगण्यात आले.

मोखाडा तालुक्यासाठी विशेष योजना

मोखाडा तालुक्यात अनेक जलस्रोत असले तरीही डिसेंबर-जानेवारी महिन्यात ते कोरडे पडत असल्याने या तालुक्यात मोठय़ा स्वरूपात जलजीवन मिशन योजना राबविण्यात येणार आहे. अप्पर वैतरणा तसेच जगनदीमधील पाण्याच्या उपसा करून गावपातळीवर टाक्या उभारून जिल्हा परिषदेमार्फत वितरण व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water supply to four and a half lakh houses in the palghar district till march 2024 zws

First published on: 31-08-2022 at 00:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×