scorecardresearch

Premium

पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची सेवा विस्कळीत

पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड व घोलवड स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे.

Western Railway services disrupted
पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची सेवा विस्कळीत (प्रातिनिधिक छायाचित्र)

पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड व घोलवड स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर तांत्रिक बिघाड झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या ठीकठिकाणी रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. हा बिघाड झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे दिली असून बहुतांश गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत असल्याचे दिसून आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Western railway long distance services disrupted ssb

First published on: 26-09-2023 at 20:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×