डहाणू: चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या मोटारचालकाच्या स्टंटबाजीमुळे  त्याच्या भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत १२ पर्यटक जखमी झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला.  ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

चालक सचिन झोपे (५८) रा. बोईसर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या धडकेत हेतन खातून (६८) या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी बोईसर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी चालक उपलब्ध नसल्याने सुज्ञ नागरिकांनी रुग्णवाहिका चालवून जखमींना बोईसर येथील रुग्णालयात पोहोचविले.  प्रियंका कोम (१८) हिच्या डोक्याला इजा झाल्याने तिला बोईसरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर जखमींमध्ये महरुन्सा सामंसुरी (१२), वैष्णवी काटकर (११), आरोही दांडेकर (७०), एंजल दांडेकर (११), प्रियंका कोम (१८), ममता हाडळ ( १२), खैतून मंसुरी (७५), प्रीती हाडळ (११), मेहरान (१२), मेहेक (१५), शौर्या (६) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर चिंचणी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. चालकाविरुद्ध वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास  साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी करत आहेत.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक