वाडा:विक्रमगड तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानल्या जाणाऱ्या देहेर्जे प्रकल्पाच्या कामाला मंगळवारी पुन्हा एकदा सुरुवात झाली. स्थानिकांचा विरोध डावलून या प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू केल्याने स्थानिक बाधित आदिवासी शेतकरी संतप्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या कारणांमुळे देहेर्जे प्रकल्पाचे काम रखडले आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या येथील शेतकऱ्यांना आजवर कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही तसेच  कुटुंबीयांच्या पुनर्वसनाबाबत कुठलीच भुमिका शासनाने स्पष्ट केलेली नाही.  विक्रमगड तालुक्यातील साखरे गावाच्या परिसरात देहेर्जे हा प्रकल्प होत असुन या प्रकल्पाचे सर्व पाणी हे वसई-विरार व मीरा भाईंदर या दोन महानगरपालिकांना नेण्यात येणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांची शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित असताना अचानक या होऊ घातलेल्या प्रकल्पाचे पाणी शहरी भागात नेण्याचा निर्णय कसा घेतला गेला, असा संतप्त सवाल येथील शेतकरी विचारू लागले आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work on the deharje project began under police protection zws
First published on: 27-05-2022 at 01:01 IST