News Flash

जाणून घ्या, ‘बाहुबली’चा सेट उभारलेल्या १०० एकर जमिनीचे आता काय झाले?

'बाहुबली' चित्रपटात दाखवण्यात आलेले भव्य सेट प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.

November 4, 2017 11:47 am

1 of 5

‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली २ द कन्क्लुजन’ चित्रपटांत दाखवण्यात आलेले भव्य सेट प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. ‘बाहुबली’च्या यशामागे ‘माहिष्माती’ची भव्यता दर्शवणाऱ्या या सेटचाही महत्त्वाचा वाटा होता. १०० एकर जमिनीवर बांधण्यात आलेल्या या सेटसाठी जवळपास ६० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. ‘बाहुबली’ चित्रपट पाहताना कदाचित आपल्याला या सेटवर जाण्याची संधी मिळाली तर…. असा विचार अनेकांच्या मनात नक्कीच आला असेल. तुमचा हा विचार सत्यात उतरला तर …. जरा विचार करा. अहो, खरंच तुम्हाला ‘बाहुबली’चा सेट पाहता येऊ शकतो. कारण, माहिष्मतीचे साम्राज्य असलेला हा सेट आता पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

1 of 5

First Published on November 4, 2017 11:44 am

Just Now!
X