14 October 2019

News Flash

मराठा मंदिरमध्ये २० वर्षांहून अधिक काळ ‘डीडीएलजे’ दाखवणारा ‘तो’ अवलिया माहितीये?

गेली कित्येक वर्षे ते प्रोजेक्टर रुममध्ये ऑपरेटर म्हणून काम पाहात आहेत

November 8, 2017 1:46 AM

1 of 5


शाहरुख खान आणि काजोल या दोघांच्याही कारकिर्दीमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाचे महत्त्वाचे स्थान आहे. ‘बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा’, असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान अनेकांच्या मनात घर करुन गेला. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विविध विक्रम प्रस्थापित केले. त्यातीलच एक विक्रम म्हणजे मराठा मंदिरमध्ये झालेल्या ‘डीडीएलजे’च्या विक्रमी स्क्रीनिंगचा. या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेतर्फे मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात १००० शो चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून शाहरुख आणि काजोलच्या प्रेमाचा प्रवास अनेकांची मनं जिंकून गेला. या प्रवासामध्ये ‘डीडीएलजे’तील प्रत्येक कलाकारासोबतच आणखी एका नावाला तितकच महत्त्वं दिलं पाहिजे. ते नाव म्हणजे, जगजीवन मारु.

1 of 5

First Published on November 8, 2017 1:46 am