20 October 2019

News Flash

PHOTOS : ही प्रसिद्ध गायिका लवकरच देणार गोड बातमी

या गायिकेने तिच्या फोटोशूटलाही म्युझिकल टच दिल्याचे दिसून येते.

November 9, 2017 9:34 AM

1 of 5

‘प्रेग्नन्सी’ ही संकल्पना आता फक्त स्टायलिश कपडे घालून मिरवण्यापुरती राहिलेली नाही, तर त्यासाठी खास ‘मॅटर्निटी फोटोग्राफी’ करण्याला पसंती मिळतेय. चारचौघांत मनमोकळं आणि बिनधास्त वावरणं प्रत्येक गरोदर महिलेला पसंत असतेच असे नाही. त्यामुळे ते ‘मिरवणे’ दूरच राहते. आता मात्र काही महिला वर्गामध्ये मिरवण्यापलीकडे जाऊन याकडे पाहिले जात आहे. कारण, खऱ्या अर्थाने प्रेग्नन्सीला ‘ग्लॅमर’ आलेय, ते मॅटर्निटी फोटोशूटमधून! परदेशात लोकप्रिय असलेला हा ट्रेण्ड आपल्याकडे आला आहे. विशिष्ट थीम घेऊन सात ते नवव्या महिन्यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर फोटोशूट करायला प्रेग्नंट महिला, जोडप्यांची पसंती मिळतेय. करिना कपूर खान, ईशा देओल, सोहा अली खान, लिसा हेडन यांसह अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या गरोदरपणात ‘मॅटर्निटी फोटोशूट’ केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता आणखी एक गायिका तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आलीय.

1 of 5

First Published on November 9, 2017 9:34 am