पुन्हा एक भीषण अग्नितांडव…
- 1 / 8
काळबादेवीतील आगीचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी पवईत आणखी एक भीषण अग्नितांडव घडले. (एक्स्प्रेस फोटो)
- 2 / 8
लघुपथनामुळे (शॉर्ट सर्किट) ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (एक्स्प्रेस फोटो)
- 3 / 8
पवईच्या चांदिवली येथील 'लेक होम' या २२ मजली इमारतीच्या १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर २८ जण गंभीर जखमी झाले. (एक्स्प्रेस फोटो)
- 4 / 8
मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
- 5 / 8
आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे इमारतीतून बाहेर पडणाऱ्या लोकांना श्वसनाचा त्रास होत होता. (एक्स्प्रेस फोटो)
- 6 / 8
काही लोकांनी उद्वाहनातून (लिफ्ट) खाली येण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्वाहनातील धुरामुळे गुदमरून त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. (एक्स्प्रेस फोटो)
- 7 / 8
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो)
- 8 / 8
वातानुकूलन यंत्रात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. क्षणार्धातच आग १५व्या मजल्यापर्यंत पसरली त्यामुळे रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. (एक्स्प्रेस फोटो)