२७ जुलै २०१५
- 1 / 6
दिल्ली न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी निर्दोष सुटका केल्यानंतर आपल्या मुलीसह आनंद साजरा करताना गोलंदाज श्रीशांत. (छायाः पीटीआय)
- 2 / 6
कारगिल विजयी दिनानिमित्त युद्धातील हुतात्म्यांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी नवी दिल्लीत रविवारी श्रद्धांजली वाहिली. (छायाः पीटीआय)
- 3 / 6
आषाढी एकादशीनिमित्त षण्मुखानंद सभागृह येथे 'बोलावा विठ्ठल' हा अभंचाचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभंग सादर करताना जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित आणि शंकर महादेवन. (छायाः दिलीप कागडा)
- 4 / 6
पंढरपुरात वारक-यांची पावले पडली की ते विठ्ठलमय होऊन जातात. उच्च-नीच, गरीब-श्रीमंतीचे भेद आपोआप गळून पडतात. आषाढी एकादशीनिमित्त रविवारी दिंड्या वाळवंटी दाखल झाल्या. विठ्ठलनामाच्या गजराने आसमंत भरुन गेला.
- 5 / 6
सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाभोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (छायाः प्रदीप दास)
- 6 / 6
पंढरपुरात आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने 'पर्यावरण वारी-पंढरीच्या दारी' या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. (छायाः पीटीआय)