-

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १३ राज्यामध्ये मतदान झाले आहे. ८९ जागांसाठी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये मतदान पार पडले आहे. (Photo: REUTERS)
-
दुसऱ्या टप्प्यात केरळमधील २०, कर्नाटकातील १४, राजस्थानमधील १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामधील ८, मध्य प्रदेशातील ७, आसाम आणि बिहारमधील ५, बंगाल आणि छत्तीसगडमधील ३, जम्मू-काश्मीर , मणिपूर, त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान झाले. (Photo: REUTERS)
-
भारतात अनेक ठिकाणी वृद्ध आणि अपंग मतदारांनी घरबसल्या मतदान केले. निवडणूक अधिकाऱ्यांनी घरोघरी पोहोचून लोकांचं मतदान करुन घेतलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकांच्या मतदानासाठी होम वोटींगची सोय केली होती. (Photo: REUTERS)
-
हे चित्र अहमदाबादमधील आहे. जिथे ८६ वर्षीय तनिकासलम मुदलियार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या होम वोटींगच्या माध्यमातून घरच्या घरी मतदान केले. (Photo: REUTERS)
-
काही ठिकाणी होम वोटींगची सुविधा उपलब्ध नसतानाही लोक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले. हे छायाचित्र उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका गावातील आहे. (Photo: REUTERS)
-
कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका हॉटेलने मतदान केलेल्या लोकांना मोफत लाडू वाटप केले. (Photo: REUTERS)
-
मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी बेंगळुरूमधील हॉटेल्सकडून विशेष ऑफर देण्यात आल्या होत्या. (Photo: REUTERS)
-
या छायाचित्रात तुम्ही पाहू शकता की, हॉटेल्सने ठेवलेल्या विशेष ऑफर्सचा लाभ मिळविण्यासाठी मतदान केल्यानंतर लोकांनी जेवणासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मतदान केल्यानंतर बोटांना लावलेली शाई तपासून त्यांना लाभ दिला जात असल्याचे दिसत आहे.(Photo: REUTERS)
-
आज देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. हे चित्र केरळमधील एरमल्लूर गावाचे आहे. मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मतदान केंद्रावर उभे असल्याचे दिसत आहे. (Photo: REUTERS)
PHOTOS: मतदारांसाठी हॉटेल्सने दिल्या विशेष ऑफर्स तर वृद्धांनी घरी बसून केले मतदान; दुसऱ्या टप्प्यात देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये आज मतदान झाले.
Web Title: Lok sabha election 2024 people eat free food by showing fingers in karnataka some voted while sitting at home see amazing photos of the second phase of voting jshd import spl