-
Lok Sabha Election Results 2024: लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांचा पराभव करत दोन लाख २३ हजारांहून अधिक मताधिक्यांनी विजय संपादन केला.
-
कल्याणमधील त्यांचा हा तिसरा विजय आहे.
-
मात्र, पाच लाखांहून अधिक मते मिळवून विक्रम रचण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.
-
या निवडणूक निकालातून कल्याणचा गड हा मुख्यमंत्री शिंदे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
-
शिवाय ही जागा जिंकून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला.
-
मुख्यमंत्रीपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे २ लाख २३ हजारांहून अधिक मते मिळवून तिसऱ्यांदा विजयी झाले.
-
या मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
-
या मतदारसंघातून सुरुवातीला डॉक्टर शिंदे बिनविरोध निवडून येतील, अशी आखणी करण्यात आली होती.
-
ते गणित जुळले नाही म्हणून माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे साडे पाच लाखाचे मताधिक्य तोडून विक्रम करण्याचे ध्येय शिंदे यांनी आखले होते.
-
प्रत्यक्षात मात्र त्यांना त्यात यश आले नाही.
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात केलेली विकास कामे, उत्सवी कार्यक्रम यामुळे श्रीकांत शिंदे यांचाच डंका होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रीकांत शिंदे / सोशल मीडिया)

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”