-

बिहारमध्ये सत्ता मिळविण्यासाठी महाआघाडीमधील आरजेडी आणि काँग्रेसपक्षाने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली असून महाआघाडीला ५० च्या पुढेही जाता आलेले नाही.
-
जागावाटपात काँग्रेसने जोरदार घासाघीस केली होती. त्यांनी अनेक जागा लढविल्या मात्र त्यांना दोन आकडी संख्याही अद्याप गाठता आलेली नाही.
-
महाआघाडीने १२ विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत केली होती. त्यामुळे विरोधकांमध्येच सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसले.
-
२०२० च्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी त्यांना १९ जागांवर विजय मिळाला होता.
-
तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाने मागच्या वेळी ७४ ठिकाणी विजय मिळवला होता. मात्र यावेळी त्यांचा पक्ष केवळ ३६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. खुद्द तेजस्वी यादव यांनाही विजयासाठी संघर्ष करावा लागल्याचे दिसले.
-
पराभवाची कारणे काय?
महाआघाडीत जागावाटपाचा मुद्दा बराच पेटला. अनेक ठिकाणी एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढत लढावी लागली. -
काँग्रेसने जागावाटपात घासाघीस केल्यानंतर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात कुचराई दाखवली. स्वतः राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणे टाळले होते.
-
राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात फार सक्रियता दाखवली नाही. त्यांनी वोट चोरीचा मुद्दा पुढे केला होता. मात्र बिहारच्या जनतेने या मुद्द्याला फारसे महत्त्व दिले नाही.
-
भाजपा-जेडीयूच्या सरकारने शेवटच्या तीन महिन्यात अनेक योजना जनतेला दिल्या. सव्वा कोटी महिलांना त्यांनी प्रति महिना १० हजार रुपये देण्यात आले. ही योजना महत्त्वाची ठरली असे सांगितले जात आहे.
राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ची निघाली हवा; बिहारच्या जनतेनं का नाकारलं?
Rahul Gandhi Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय होताना दिसत असून काँग्रेससह महाआघाडीचे पानिपत होताना दिसत आहे.
Web Title: Congess rahul gandhi performance mahagathbandhan trails in bihar election result 2025 kvg