मोहम्मद रफी स्मृतिदिन – तुम मुझे यूं भूला ना पाओगे
- 1 / 27
भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली, ठुमरी, भजन, पाश्चात्त्य संगीत अशा विविध संगीत शैलींमध्ये आपल्या पार्श्वगायनाने सर्व वयोगटातील श्रोत्यांना ज्या अवलियाने संगीताच्या प्रेमात पाडले असे पार्श्वगायक म्हणजे मोहम्मद रफी. रफी आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या गाण्यांनी त्यांचे कार्य अजरामर करून ठेवले आहे. मोहम्मद रफी यांचा आज ३६ वा स्मृतिदिन. (एक्स्प्रेस फोटो)
- 2 / 27
अभिनेत्री शर्मिला टागोरसोबत पार्श्वगायक मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 3 / 27
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक कुमार यांच्यासमवेत मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 4 / 27
मोहम्मद रफी आणि संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल. (एक्स्प्रेस फोटो)
- 5 / 27
संगीत दिग्दर्शक रवी, गायिका आशा भोसले यांच्यासोबत गाण्याच्या रेकॉर्डिंगचा सराव करताना मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 6 / 27
किशोर कुमार आणि मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 7 / 27
चित्रपट दिग्दर्शक मोहन कुमार, श्याम बहल, मोहम्मद रफी आणि दिग्दर्शक रामानंद सागर, अभिनेते राजेंद्र कुमार यांचा निर्माते-दिग्दर्शक मोहन कुमार यांनी आयोजित केलेल्या पार्टीत घेतलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 8 / 27
गायिका आशा भोसले आणि मोहम्मद रफी आपला मुलगा हमीदसमवेत. (एक्स्प्रेस फोटो)
- 9 / 27
मोहम्मद रफी यांचे अमेरिकेतील लिंकन मेमोरिअलच्या पार्श्वभूमीवर घेतलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 10 / 27
आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचे 'शंकर हुसैन' या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्डिंग करताना घेतलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 11 / 27
संगीतकार नौशाद, पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 12 / 27
अभिनेता जगदिप आणिमोहम्मद रफी यांचे 'मिट्टी के खिलौने' या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्डिंग करताना घेतलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 13 / 27
पार्श्वगायक मोहम्मद रफी हार्मोनिअम वादन करताना. (एक्स्प्रेस फोटो)
- 14 / 27
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगावर प्रतिभेची मोहोर उमटवलेल्या कलाकारांमधील प्रमुख नाव म्हणजे मोहम्मद रफी. (छाया- मोहन वाघ)
- 15 / 27
'आयी मिलन की बेला' या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने मोहम्मद रफी आणि अभिनेते देव आनंद यांचे एकत्रित टिपलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 16 / 27
'समाज को बदल डालो' चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी मोहम्मद रफी आणि दिग्दर्शक रवी. (एक्स्प्रेस फोटो)
- 17 / 27
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पद्मश्री मोहम्मद रफी यांचे दुर्मिळ छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 18 / 27
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे दुर्मिळ छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 19 / 27
रफी आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या गाण्यांनी त्यांचे कार्य अजरामर करून ठेवले आहे. (एक्स्प्रेस फोटो)
- 20 / 27
भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली, ठुमरी, भजन, पाश्चात्त्य संगीत अशा विविध संगीत शैलींमध्ये मोहम्मद रफी गायले. (एक्स्प्रेस फोटो)
- 21 / 27
हाजी अली मोहम्मद यांच्यासमवेत मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 22 / 27
'बिन बादल बरसात' चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी अभिनेता मेहमूद आणि मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 23 / 27
निर्माते टि. सी. देवान, सहनिर्माते राजन हसकर आणि मोहम्मद रफी 'प्यार का सपना' चित्रपटाच्या सेटवर. (एक्स्प्रेस फोटो)
- 24 / 27
निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते देव आनंद, सुनिल दत्त आणि मोहम्मद रफी यांचे 'जयदेव' चित्रपटाच्या सेटवर टिपलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
- 25 / 27
अभिनेत्री सुमन सिन्हा आणि मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 26 / 27
आपल्या पार्श्वगायनाने सर्व वयोगटातील श्रोत्यांना ज्या अवलियाने संगीताच्या प्रेमात पाडले असे पार्श्वगायक म्हणजे मोहम्मद रफी. (एक्स्प्रेस फोटो)
- 27 / 27
चित्रपट अभिनेते शशी कपूर, मौशमी चटर्जी, राज कपूर, मोहम्मद रफी, आशा पारेख एकाच रंगमंचावर असतानाचे दुर्मिळ छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)