‘मोहेंजोदारो’च्या प्रमोशनसाठी हृतिक, पूजा कपिलच्या शोमध्ये
- 1 / 7
अभिनेता हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या बहुप्रतिक्षित ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. (छायाचित्र- varinder chawala)
- 2 / 7
‘मोहेंजोदारो’च्या निमित्ताने हृतिक रोशन आणि पूजा हेगडेच्या रुपात एक नवी जोडी सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूजा हेगडेचा हा पहिलाच चित्रपट आहे. (छायाचित्र- varinder chawala)
- 3 / 7
येत्या १२ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ला टक्कर देणार आहे. (छायाचित्र- varinder chawala)
- 4 / 7
या चित्रपटातून हजारो वर्षांची जूनी नागरी संस्कृती दिग्दर्शक आतुषोश गोवारीकर यांनी जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा ऐतिहासिक चित्रपट नसून प्रेमकथा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (छायाचित्र- varinder chawala)
- 5 / 7
गोवारीकर यांच्या इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटाचा कालावधी हा कमी असणार आहे. हा चित्रपट १५० मिनिटांचा असेल अशीही चर्चा आहे. (छायाचित्र- varinder chawala)
- 6 / 7
या कार्यक्रमात वि्नोदवीर सुनिल ग्रोवर ‘चानी’च्या वेशात आला. या चित्रपटात पूजा हेगडे ही ‘चानी’ची भूमिका करते आहे. चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पूजा ज्यावेशात होती तसाच वेश परिधान करत सुनिल ग्रोवर आला होता. (छायाचित्र- varinder chawala)
- 7 / 7
किकू शारदा तरी मागे कसा राहिल. हृतिकच्या कोई मिल गया या सिनेमातल्या जादूच्या रूपात तो आला आणि आपल्या विनोदाच्या जादूने त्यांने सगळ्यांची मने जिंकली. (छायाचित्र- varinder chawala)