आराध्या जगातली सर्वात सुंदर नात- अमिताभ
- 1 / 12
१६ नोव्हेंबरला आराध्या बच्चन पाच वर्षांची झाली. या दिवसाचे औचित्य साधून आजोबा बिग बी यांनी ती जगातली सगळ्यात सुंदर नात असल्याचे पोस्टही शेअर केले.
- 2 / 12
ते लिहितात की, आज आराध्या जरी ५ वर्षांची झाली असली तरी ५५ वर्षांच्या व्यक्तीसारखी वागते. आज कालची मुले ही खूप हुशार, बुद्धीमान आहेत. त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याचे पूर्ण ज्ञान त्यांना असते.
- 3 / 12
यावेळी त्यांनी ऐश्वर्याचेही कौतुक केले. आराध्याला नक्की काय म्हणायचे आहे हे कधी कधी आम्हाला कळत नाही. पण ऐश्वर्याला मात्र आराध्याच्या मनातले ओळखते. आई आणि मुलीचे संबंध काही वेगळेच असतात.
- 4 / 12
सध्या ऐश्वर्या तिच्या मुलीच्या बर्थडे पार्टीच्या तयारीमध्ये व्यग्र आहे.
- 5 / 12
२० नोव्हेंबरला ती आराध्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. याच दिवशी ऐश्वर्याचे बाबा कृष्णराज राय यांचा वाढदिवस असतो.
- 6 / 12
२० तारखेला राय आणि बच्चन कुटुंबिय ही बर्थडे पार्टी त्यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर बी-टाऊनच्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरी करणार आहेत.
- 7 / 12
आराध्याही तिच्या आजोबांसोबत वाढदिवस साजरा करायला उत्सुक आहे. सजावट कशी असावी याबद्दल तिनेही काही सुचना दिल्या आहेतच.
- 8 / 12
यावेळी कृष्णराज राय यांच्या आवडीच्या पदार्थांचा समावेश जेवणात करण्यात येणार आहे.
- 9 / 12
बाबा अभिषेक बच्चनसोबत आराध्या बच्चन
- 10 / 12
सोशल मीडियावर अभिषेक आपल्या कुटुंबासोबतचे फोटो अनेकदा शेअर करतो
- 11 / 12
होळीच्या वेळी त्यांच्या छोट्या कुटुंबाचा काढलेला हा छानसा फोटो
- 12 / 12
आई ऐश्वर्या आणि आत्या श्वेता नंदासोबत आराध्या