18 November 2017

News Flash

Reema Lagoo : सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते….

 • ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ५९ वर्षांच्या होत्या. काल छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (छाया सौजन्य: एक्स्प्रेस आर्काइव्ह)

  ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ५९ वर्षांच्या होत्या. काल छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (छाया सौजन्य: एक्स्प्रेस आर्काइव्ह)

 • रात्री एकच्या सुमारास रिमा यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे जावई विनय वायकुळ यांनी दिली. ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (छाया सौजन्य: एक्स्प्रेस आर्काइव्ह)

  रात्री एकच्या सुमारास रिमा यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे जावई विनय वायकुळ यांनी दिली. ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (छाया सौजन्य: एक्स्प्रेस आर्काइव्ह)

 • ७०-८० च्या दशकात रिमा लागू यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम सुरु केले.

  ७०-८० च्या दशकात रिमा लागू यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम सुरु केले.

 • कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी चित्रपट. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांच्या या भूमिका चांगल्याच गाजल्या.

  कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी चित्रपट. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांच्या या भूमिका चांगल्याच गाजल्या.

 • 'सविता दामोदर परांजपे', 'विठो रखुमाय', 'घर तिघांचं हवं', 'चल आटप लवकर', 'झाले मोकळे आकाश', 'तो एक क्षण', 'पुरुष बुलंद' ही त्यांची नाटक विशेष गाजली.

  'सविता दामोदर परांजपे', 'विठो रखुमाय', 'घर तिघांचं हवं', 'चल आटप लवकर', 'झाले मोकळे आकाश', 'तो एक क्षण', 'पुरुष बुलंद' ही त्यांची नाटक विशेष गाजली.

 • करिअरच्या सुरुवातीला त्यांनी 'आक्रोश' चित्रपटात डान्सरची भूमिका केली होती.

  करिअरच्या सुरुवातीला त्यांनी 'आक्रोश' चित्रपटात डान्सरची भूमिका केली होती.

 • बॉलिवूडची 'फेव्हरेट मॉम' म्हणून रिमा लागू ओळखल्या जायच्या.

  बॉलिवूडची 'फेव्हरेट मॉम' म्हणून रिमा लागू ओळखल्या जायच्या.

 • सलमान खान, काजोल आणि माधुरी दीक्षितच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. रिमा यांच्या अचानक जाण्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील आई हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

  सलमान खान, काजोल आणि माधुरी दीक्षितच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. रिमा यांच्या अचानक जाण्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील आई हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 • राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'मैने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ है', 'वास्तव', 'साजन', 'कुछ कुछ होता है', 'आशिकी', 'आई शप्पथ', 'बिंधास्त', 'जाऊ द्या ना बाळासाहेब', 'सातच्या आत घरात', 'मुक्ता' यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.

 • आपल्या मुलाच्या चुकांवर पांघरूण न घालता अखेर त्याला गोळ्या घालून ठार करणारी आई त्यांनी 'वास्तव' चित्रपटात लिलया साकारली.

  आपल्या मुलाच्या चुकांवर पांघरूण न घालता अखेर त्याला गोळ्या घालून ठार करणारी आई त्यांनी 'वास्तव' चित्रपटात लिलया साकारली.

 • सुप्रिया पिळगावकर बरोबरची 'तू तू-मै मै', 'श्रीमान-श्रीमती' या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या.

  सुप्रिया पिळगावकर बरोबरची 'तू तू-मै मै', 'श्रीमान-श्रीमती' या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या.

 • विवेक लागू यांच्याबरोबर त्यांचे लग्न झाले पण काही वर्षच त्यांचा संसार टिकला. त्यानंतर दोघेही विभक्त झाले. त्यांची मुलगी मुण्मयी ही सुद्धा अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.

  विवेक लागू यांच्याबरोबर त्यांचे लग्न झाले पण काही वर्षच त्यांचा संसार टिकला. त्यानंतर दोघेही विभक्त झाले. त्यांची मुलगी मुण्मयी ही सुद्धा अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.

 • अभिनेते विक्रम गोखले यांनी आपली लाडकी बालमैत्रिण गेल्याचे वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

  अभिनेते विक्रम गोखले यांनी आपली लाडकी बालमैत्रिण गेल्याचे वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

 • रिमा यांना 'मैने प्यार किया' (१९९०), 'आशिकी' (१९९१), 'हम आपके है कौन' (१९९५) आणि 'वास्तव' (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी फिल्मेफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

  रिमा यांना 'मैने प्यार किया' (१९९०), 'आशिकी' (१९९१), 'हम आपके है कौन' (१९९५) आणि 'वास्तव' (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी फिल्मेफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

अन्य फोटो गॅलरी