18 November 2017

News Flash

Reema Lagoo funeral : अखेरचा हा तुला दंडवत!

 • ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनामुळे सध्या कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांचा यावर विश्वासच बसत नव्हता. पण, ही गोष्ट पचवणं कितीही कठीण असलं तरीही आता त्या आपल्यात नाहीच हेच खरं. (छायाः वरिन्दर चावला)

  ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनामुळे सध्या कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांचा यावर विश्वासच बसत नव्हता. पण, ही गोष्ट पचवणं कितीही कठीण असलं तरीही आता त्या आपल्यात नाहीच हेच खरं. (छायाः वरिन्दर चावला)

 • रिमा यांच्या अंत्यदर्शनाला आमिर खान आणि किरण राव उपस्थित होते. आमिर म्हणाला की, त्यांना कोणताही आजार नव्हता त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. त्या एक निर्मळ मनाच्या अभिनेत्री होत्या. (छायाः वरिन्दर चावला)

  रिमा यांच्या अंत्यदर्शनाला आमिर खान आणि किरण राव उपस्थित होते. आमिर म्हणाला की, त्यांना कोणताही आजार नव्हता त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. त्या एक निर्मळ मनाच्या अभिनेत्री होत्या. (छायाः वरिन्दर चावला)

 • मी रिमा यांना माझ्या आगामी चित्रपटासाठी विचारणार होतो. पण, त्याआधीच त्यांच्या निधनाचे वृत्त माझ्या कानावर पडले, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले. (छायाः वरिन्दर चावला)

  मी रिमा यांना माझ्या आगामी चित्रपटासाठी विचारणार होतो. पण, त्याआधीच त्यांच्या निधनाचे वृत्त माझ्या कानावर पडले, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले. (छायाः वरिन्दर चावला)

 • आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता, अभिनेत्री नीलम तसेच काही मराठी कलाकारांनी रिमा यांचे अंत्यदर्शन घेतले. (छायाः वरिन्दर चावला)

  आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता, अभिनेत्री नीलम तसेच काही मराठी कलाकारांनी रिमा यांचे अंत्यदर्शन घेतले. (छायाः वरिन्दर चावला)

 • अभिनेते मनोज जोशीदेखील रिमा यांच्या अंत्यदर्शनाला गेले होते. (छायाः वरिन्दर चावला)

  अभिनेते मनोज जोशीदेखील रिमा यांच्या अंत्यदर्शनाला गेले होते. (छायाः वरिन्दर चावला)

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अमिताभ बच्चन या सर्वांनीच रिमा यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे. रिमाताईंसोबत स्क्रीन शेअर केलेल्या आणि न केलेल्याही बऱ्याच कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. (छायाः वरिन्दर चावला)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अमिताभ बच्चन या सर्वांनीच रिमा यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे. रिमाताईंसोबत स्क्रीन शेअर केलेल्या आणि न केलेल्याही बऱ्याच कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. (छायाः वरिन्दर चावला)

अन्य फोटो गॅलरी