18 November 2017

News Flash

आकाश आणि लावणीचं झिंगाट नातं

 • आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आकाश ठोसर त्याच्या नवीन चित्रपटाच्या म्हणजेच 'एफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड'च्या प्रमोशनसाठी सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे आणि शुभम यांच्यासोबत ढोलकीच्या तालावरच्या सेटवर आले. हा विशेष भाग प्रेक्षकांना २९ आणि ३० मे रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर बघायला मिळेल.

  आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आकाश ठोसर त्याच्या नवीन चित्रपटाच्या म्हणजेच 'एफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड'च्या प्रमोशनसाठी सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे आणि शुभम यांच्यासोबत ढोलकीच्या तालावरच्या सेटवर आले. हा विशेष भाग प्रेक्षकांना २९ आणि ३० मे रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर बघायला मिळेल.

 • ढोलकीच्या तालावर कार्यक्रमातील स्पर्धकांना एक सरप्राईज मिळाले आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला स्वत:च्या प्रेमात पाडले म्हणजेच आकाश ठोसर चित्रपटाच्य टीमसोबत 'एफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड'च्या प्रमोशनसाठी ढोलकीच्या तालावरच्या मंच्यावर आला आणि त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली.

  ढोलकीच्या तालावर कार्यक्रमातील स्पर्धकांना एक सरप्राईज मिळाले आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला स्वत:च्या प्रेमात पाडले म्हणजेच आकाश ठोसर चित्रपटाच्य टीमसोबत 'एफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड'च्या प्रमोशनसाठी ढोलकीच्या तालावरच्या मंच्यावर आला आणि त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली.

 • लहान समृद्धीने उगवली शुक्राची चांदणी या गाण्यावर नृत्य सादर केले. तिची लावणी आकाश ठोसरला इतकी आवडली की त्याने तिला घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. आकाश ठोसरने अनेक गंमती – जंमती, आठवणी यावेळेस प्रेक्षकांना सांगितल्या. लावणी हा असा नृत्यप्रकार आहे जो कोणाला बघायला आवडत नाही असे नाही. याचसंदर्भात बोलत असताना आकाश म्हणाला, ‘मी पेहलवान असताना लावण्या चोरून बघायचो”.

  लहान समृद्धीने उगवली शुक्राची चांदणी या गाण्यावर नृत्य सादर केले. तिची लावणी आकाश ठोसरला इतकी आवडली की त्याने तिला घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. आकाश ठोसरने अनेक गंमती – जंमती, आठवणी यावेळेस प्रेक्षकांना सांगितल्या. लावणी हा असा नृत्यप्रकार आहे जो कोणाला बघायला आवडत नाही असे नाही. याचसंदर्भात बोलत असताना आकाश म्हणाला, ‘मी पेहलवान असताना लावण्या चोरून बघायचो”.

 • कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेव्हा आकाशसोबत शकुताईंनी, छोट्या अप्सरांनी एकत्र येऊन झिंगाट गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. तसेच मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांनी म्हणजेच सत्या, शुभम, मयुरेश, जितेंद्र, हेमंत आणि आकाशने सगळ्या लहान मुलींना पाठीवर घेऊन जोर बैठका मारल्या ज्यामध्ये आकाश ठोसर विजेता ठरला. अश्याप्रकारे ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये एफयूच्या टीमने आणि स्पर्धकांनी तसेच परीक्षकांनी खूप धम्माल केली.

  कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेव्हा आकाशसोबत शकुताईंनी, छोट्या अप्सरांनी एकत्र येऊन झिंगाट गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. तसेच मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांनी म्हणजेच सत्या, शुभम, मयुरेश, जितेंद्र, हेमंत आणि आकाशने सगळ्या लहान मुलींना पाठीवर घेऊन जोर बैठका मारल्या ज्यामध्ये आकाश ठोसर विजेता ठरला. अश्याप्रकारे ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये एफयूच्या टीमने आणि स्पर्धकांनी तसेच परीक्षकांनी खूप धम्माल केली.

 • येत्या २ जूनला महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड' प्रदर्शित होईल.

  येत्या २ जूनला महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड' प्रदर्शित होईल.

अन्य फोटो गॅलरी