सारा, सोहेल खानमुळे जीम मालकाला बोलवावे लागले पोलीस
- 1 / 6
सेलिब्रिटींची आयुष्य काही सोप्प नसतं. ते जिथे जातात तिथे त्यांचा पाठलाग केला जातो, त्यांचे फोटो काढले जातात आणि दुसऱ्याच दिवशी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण, हे सर्व थांबवण कलाकारांच्या हातात नसतं. मात्र त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींनाच याच तारतम्य ठेवण्याची गरज असते. गुरुवारी एका जीम मालकाने अशाच एका घटनेमुळे चक्क पोलिसांनाच बोलावले. जीममधून बाहेर पडणाऱ्या सेलिब्रिटींचे फोटो काढण्यासाठी वाट पाहत असलेल्या फोटोग्राफर्सना तेथून घालवण्यासाठी जीम मालकाने पोलिसांना बोलावले. तरीही सारा अली खान आणि सोहेल खान हे जीममधून बाहेर पडताना फोटोग्राफर्सना त्यांचे फोटो टिपण्यात यश मिळाले. (छाया: वरिन्दर चावला)
- 2 / 6
वर्कआउट झाल्यानंतर जीममधून बाहेर पडताना सारा अली खान. यावेळी सारा फोनमध्ये एवढी गुंतली होती की फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत असल्याचेही तिला भान नव्हते. (छाया: वरिन्दर चावला)
- 3 / 6
सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (छाया: वरिन्दर चावला)
- 4 / 6
काही वेळानंतर सोहेलही जीममधून बाहेर पडला. पण अगदी काही क्षणांतच पोलिसांनी त्याला घेरून फोटोग्राफर्सच्या नजरेतून वाचवण्याचा प्रयत्न केला. (छाया: वरिन्दर चावला)
- 5 / 6
रिहा चक्रवर्ती (छाया: वरिन्दर चावला)
- 6 / 6
सूरज पांचोली (छाया: वरिन्दर चावला)