16 December 2017

News Flash

Independence Day 2017 : थुकरटवाडीत भारतीय महिला क्रिकेट संघाची फटकेबाजी

 • चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू सहभागी होणार आहेत.

  चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू सहभागी होणार आहेत.

 • ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि अंतिम फेरीत धडकही मारली.

  ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि अंतिम फेरीत धडकही मारली.

 • या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे सहभागी झाले होते. या टीमशिवाय या कार्यक्रमात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीमसुद्धा सहभागी झाली होती.

  या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे सहभागी झाले होते. या टीमशिवाय या कार्यक्रमात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीमसुद्धा सहभागी झाली होती.

 • येत्या १४ आणि १५ ऑगस्टला हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

  येत्या १४ आणि १५ ऑगस्टला हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

 • पहिल्यांदाच अशा मराठी कार्यक्रमात या खेळाडू सहभागी झाल्या होत्या.

  पहिल्यांदाच अशा मराठी कार्यक्रमात या खेळाडू सहभागी झाल्या होत्या.

 • 'चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मी नेहमी बघते आणि तो मला खूप आवडतो' असे पूनम राऊत म्हणाली. तर 'विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाही या कार्यक्रमाची संघात चर्चा व्हायची, याबद्दल मी खूप ऐकलं होतं त्यामुळे यात सहभागी होण्याबद्दल उत्सुक होते', असं स्मृती मंधानाने सांगितलं.

  'चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मी नेहमी बघते आणि तो मला खूप आवडतो' असे पूनम राऊत म्हणाली. तर 'विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाही या कार्यक्रमाची संघात चर्चा व्हायची, याबद्दल मी खूप ऐकलं होतं त्यामुळे यात सहभागी होण्याबद्दल उत्सुक होते', असं स्मृती मंधानाने सांगितलं.

अन्य फोटो गॅलरी