18 November 2017

News Flash

Ganesh Utsav 2017 : गश्मीर महाजनीच्या घरचा बाप्पा

 • दिग्गज अभिनेता रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याच्या घरी गणपतीचे पाच दिवसांसाठी आगमन होते.

  दिग्गज अभिनेता रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याच्या घरी गणपतीचे पाच दिवसांसाठी आगमन होते.

 • आईच्या हातचे उकडीचे मोदक खायला माझी मित्रमंडळी येतात. पण मला मात्र उकडीचे मोदक अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मी बाकीच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारतो, असेही गश्मीर म्हणाला.

  आईच्या हातचे उकडीचे मोदक खायला माझी मित्रमंडळी येतात. पण मला मात्र उकडीचे मोदक अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मी बाकीच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारतो, असेही गश्मीर म्हणाला.

 • गश्मीर म्हणतो की, माझ्या आजोबांपासून आमच्या घरी गणपती बाप्पाचे पाच दिवसांसाठी आगमन होते. आमच्या घरी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतो. साधेचं डेकोरेशन करण्यावर आमचा भर असतो.

  गश्मीर म्हणतो की, माझ्या आजोबांपासून आमच्या घरी गणपती बाप्पाचे पाच दिवसांसाठी आगमन होते. आमच्या घरी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतो. साधेचं डेकोरेशन करण्यावर आमचा भर असतो.

 • माझी डान्स अकॅडमी सुरू झाल्यापासून माझे विद्यार्थी गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून घरी येतात आणि त्यामुळे घर अगदी भरलेलं असतं, असे गश्मीर म्हणाला.

  माझी डान्स अकॅडमी सुरू झाल्यापासून माझे विद्यार्थी गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून घरी येतात आणि त्यामुळे घर अगदी भरलेलं असतं, असे गश्मीर म्हणाला.

 • कितीही काम असलं तरीही गश्मीर गणेशोत्सवाच्या काळात घरीच सुट्टी घेऊन राहण्यावर भर देतो. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणं, आणि त्याचे षोडशोपचारे पूजन करणं त्याला खूप आवडते.

  कितीही काम असलं तरीही गश्मीर गणेशोत्सवाच्या काळात घरीच सुट्टी घेऊन राहण्यावर भर देतो. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणं, आणि त्याचे षोडशोपचारे पूजन करणं त्याला खूप आवडते.

अन्य फोटो गॅलरी