22 November 2017

News Flash

‘इंडो-जॉर्जियन डान्स फ्युजन’ला कलाकारांची मांदियाळी

 • मुंबईत हेमा मालिनी यांनी 'सिनर्जी' इंडो-जॉर्जियन डान्स फ्युजन कार्यक्रमाचं आयोजन केलं. कार्यक्रमाला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हजर राहिले. 'हेमा मालिनी नेहमीच चौकटीबाहेर विचार करतात आणि नवनवीन कल्पना सर्वांसमोर घेऊन येतात,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

  मुंबईत हेमा मालिनी यांनी 'सिनर्जी' इंडो-जॉर्जियन डान्स फ्युजन कार्यक्रमाचं आयोजन केलं. कार्यक्रमाला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हजर राहिले. 'हेमा मालिनी नेहमीच चौकटीबाहेर विचार करतात आणि नवनवीन कल्पना सर्वांसमोर घेऊन येतात,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

 • जॉर्जियातील कलाकारांच्या नृत्याने प्रभावित होऊन हेमा मालिनी यांनी भारतात तसा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. या महोत्सवाच्या माध्यमातून हेमा मालिनी इंडो-जॉर्जियन डान्स फ्जुजनची भारतीयांना ओळख करुन देणार आहेत.

  जॉर्जियातील कलाकारांच्या नृत्याने प्रभावित होऊन हेमा मालिनी यांनी भारतात तसा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. या महोत्सवाच्या माध्यमातून हेमा मालिनी इंडो-जॉर्जियन डान्स फ्जुजनची भारतीयांना ओळख करुन देणार आहेत.

 • बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता.

  बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता.

 • हेमा मालिनी यांची मुलगी इशा देओल पती भरत तख्तानीसोबत कार्यक्रमाला पोहोचली.

  हेमा मालिनी यांची मुलगी इशा देओल पती भरत तख्तानीसोबत कार्यक्रमाला पोहोचली.

 • 'गेल्या १२ वर्षांपासून आम्ही असा कार्यक्रम करतोय. माझ्या आजीला या कार्यक्रमाद्वारे आम्ही श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या नावाने आधी 'जया स्मृती' असं कार्यक्रमाचं नाव होतं. मात्र यंदा जॉर्जियन डान्सर्सचा यात समावेश असल्याने 'सिनर्जी' असं नाव ठेवण्यात आलं,' असं इशा म्हणाली.

  'गेल्या १२ वर्षांपासून आम्ही असा कार्यक्रम करतोय. माझ्या आजीला या कार्यक्रमाद्वारे आम्ही श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या नावाने आधी 'जया स्मृती' असं कार्यक्रमाचं नाव होतं. मात्र यंदा जॉर्जियन डान्सर्सचा यात समावेश असल्याने 'सिनर्जी' असं नाव ठेवण्यात आलं,' असं इशा म्हणाली.

 • मुंबईसोबतच दिल्लीत १० सप्टेंबर, कोलकातामध्ये १५ सप्टेंबर आणि चेन्नईत १७ सप्टेंबरला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

  मुंबईसोबतच दिल्लीत १० सप्टेंबर, कोलकातामध्ये १५ सप्टेंबर आणि चेन्नईत १७ सप्टेंबरला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

अन्य फोटो गॅलरी