16 December 2017

News Flash

Throwback Thursday : बॉलिवूडच्या इतिहासातील मोठे अपघात

 • बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटादरम्यानचा किस्सा सर्वांनाच माहित आहे. जुलै १९८२ मध्ये चित्रपटातील एक साहसदृष्य करताना अमिताभ यांना दुखापत झाली होती. दृष्याचे चित्रीकरण करताना बिग बींच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला आणि त्यांना गंभीर जखम झालेली. त्यानंतर मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना ताबडतोब दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती खूप नाजूक होती असे म्हटले जाते. अमिताभ बच्चन वाचतील की नाही असा प्रश्नच निर्माण झाला होता. मात्र २ ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी एड्रेनलाइन इंजेक्शन थेट त्यांच्या हृदयात लावली. नंतर प्रकृती सुधारल्यावर १९८३ साली त्यांनी पुन्हा ‘कुली’च्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली.

  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटादरम्यानचा किस्सा सर्वांनाच माहित आहे. जुलै १९८२ मध्ये चित्रपटातील एक साहसदृष्य करताना अमिताभ यांना दुखापत झाली होती. दृष्याचे चित्रीकरण करताना बिग बींच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला आणि त्यांना गंभीर जखम झालेली. त्यानंतर मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना ताबडतोब दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती खूप नाजूक होती असे म्हटले जाते. अमिताभ बच्चन वाचतील की नाही असा प्रश्नच निर्माण झाला होता. मात्र २ ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी एड्रेनलाइन इंजेक्शन थेट त्यांच्या हृदयात लावली. नंतर प्रकृती सुधारल्यावर १९८३ साली त्यांनी पुन्हा ‘कुली’च्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली.

 • 'शूटआऊट अॅट वडाला' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, अभिनेता जॉन अब्राहम जणू मृत्यूच्या दारातून परतला होता. यात त्याने गँगस्टर मन्या सुर्वेची भूमिका साकारली होती. चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारत असलेल्या अनिल कपूरला कमीत कमी १५ फूटाच्या अंतरावरून काडतूस नसलेली गोळी जॉनवर झाडायची होती. त्याऐवजी, अनिलने १.५ फूटाच्या अंतरावरूनच त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, अनिलचा नेम खराब असल्यामुळे ती गोळी जॉनच्या मानेला चाटून गेली.

  'शूटआऊट अॅट वडाला' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, अभिनेता जॉन अब्राहम जणू मृत्यूच्या दारातून परतला होता. यात त्याने गँगस्टर मन्या सुर्वेची भूमिका साकारली होती. चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारत असलेल्या अनिल कपूरला कमीत कमी १५ फूटाच्या अंतरावरून काडतूस नसलेली गोळी जॉनवर झाडायची होती. त्याऐवजी, अनिलने १.५ फूटाच्या अंतरावरूनच त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, अनिलचा नेम खराब असल्यामुळे ती गोळी जॉनच्या मानेला चाटून गेली.

 • 'खाकी' चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना ऐश्वर्या राय बच्चनचा जीव जरासाठी वाचला होता. एका दृश्यादरम्यान, ड्रायव्हरला वेगाने जीप चालवत ऐश्वर्या आणि तुषार कपूर यांच्यासमोर येऊन काही अंतरावर गाडी थांबवायची होती. मात्र, ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्या दोघांचा अपघात झाला. योग्य उपचार घेतल्यानंतर ऐश्वर्याला नंतर लगेच हेलिकॉप्टरने मुंबईतील सिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

  'खाकी' चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना ऐश्वर्या राय बच्चनचा जीव जरासाठी वाचला होता. एका दृश्यादरम्यान, ड्रायव्हरला वेगाने जीप चालवत ऐश्वर्या आणि तुषार कपूर यांच्यासमोर येऊन काही अंतरावर गाडी थांबवायची होती. मात्र, ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्या दोघांचा अपघात झाला. योग्य उपचार घेतल्यानंतर ऐश्वर्याला नंतर लगेच हेलिकॉप्टरने मुंबईतील सिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 • बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार हा चित्रपटातील त्याचे स्टंट स्वतःच करतो हे सर्वांनाच माहित आहे. पण, त्याची ही खिलाडीवृत्ती एकदा त्याच्या अपघातासाठी कारणीभूत ठरली होती. 'खिलाडीयो का खिलाडी'च्या चित्रीकरणादरम्यान त्याला पाठीला दुखापत झालेली. आजही या दुखापतीमुळे त्याला त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर 'रावडी राठोड'च्या सेटवर त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या अक्षयला सावरण्यासाठी एक आठवडा लागला होता.

  बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार हा चित्रपटातील त्याचे स्टंट स्वतःच करतो हे सर्वांनाच माहित आहे. पण, त्याची ही खिलाडीवृत्ती एकदा त्याच्या अपघातासाठी कारणीभूत ठरली होती. 'खिलाडीयो का खिलाडी'च्या चित्रीकरणादरम्यान त्याला पाठीला दुखापत झालेली. आजही या दुखापतीमुळे त्याला त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर 'रावडी राठोड'च्या सेटवर त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या अक्षयला सावरण्यासाठी एक आठवडा लागला होता.

 • बॉलिवूडचा बादशहा असलेल्या शाहरुख खानला किंग ऑफ इंज्युरीज असेही म्हटले जाते. तो दरवर्षी कोणत्या ना कोणत्या सर्जरीसाठी परदेशात जातच असतो. स्वतःचे स्टंट स्वतः करण्यास प्राधान्य देणाऱ्या शाहरुखला हात, पायाची बोटं, मान, गुडघे, खांदा, स्लिप डिस्क अशाप्रकारे शरिराच्या प्रत्येक भागाला आजवर दुखापत झालेली आहे. हॅप्पी न्यू इयरच्या चित्रीकरणावेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर काही शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या.

  बॉलिवूडचा बादशहा असलेल्या शाहरुख खानला किंग ऑफ इंज्युरीज असेही म्हटले जाते. तो दरवर्षी कोणत्या ना कोणत्या सर्जरीसाठी परदेशात जातच असतो. स्वतःचे स्टंट स्वतः करण्यास प्राधान्य देणाऱ्या शाहरुखला हात, पायाची बोटं, मान, गुडघे, खांदा, स्लिप डिस्क अशाप्रकारे शरिराच्या प्रत्येक भागाला आजवर दुखापत झालेली आहे. हॅप्पी न्यू इयरच्या चित्रीकरणावेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर काही शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या.

 • 'लुटेरा'च्या चित्रीकरणादरम्यान रणवीरला पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला काही महिने रुपेरी पडद्यापासून दूर राहावे लागले होते.

  'लुटेरा'च्या चित्रीकरणादरम्यान रणवीरला पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला काही महिने रुपेरी पडद्यापासून दूर राहावे लागले होते.

 • 'अग्नीपथ'च्या रिमेकवेळी हृतिकच्या पाठीला दुखापत झाली होती. ब्रिच कॅन्डी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

  'अग्नीपथ'च्या रिमेकवेळी हृतिकच्या पाठीला दुखापत झाली होती. ब्रिच कॅन्डी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

अन्य फोटो गॅलरी