25 November 2017

News Flash

Childrens Day 2017 : ‘देवा’चे बच्चेकंपनीसोबत ‘बालदिन’ सेलिब्रेशन

  • लहानपण हे एका फुलासारखे असते... आणि त्याची आठवण म्हणजे त्या फुलांचा सुगंध ! अश्या या रंगबेरंगी फुलांसोबत 'देवा' फेम अभिनेता अंकुश चौधरीने नुकताच 'बालदिन' साजरा केला.

    लहानपण हे एका फुलासारखे असते... आणि त्याची आठवण म्हणजे त्या फुलांचा सुगंध ! अश्या या रंगबेरंगी फुलांसोबत 'देवा' फेम अभिनेता अंकुश चौधरीने नुकताच 'बालदिन' साजरा केला.

  • आज १४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असलेल्या 'बालदिन'चे औचित्य साधत, निलांबरी या बिनछताच्या बसमध्ये काही गरजू आणि अनाथ मुलांबरोबर अंकुशने बालदिनाचा आनंद लुटला.

    आज १४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असलेल्या 'बालदिन'चे औचित्य साधत, निलांबरी या बिनछताच्या बसमध्ये काही गरजू आणि अनाथ मुलांबरोबर अंकुशने बालदिनाचा आनंद लुटला.

  • इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने, आपल्या लाडक्या अंकुशसोबत काहीवेळ घालवण्याची नामी संधी बच्चेकंपनीने पुरेपूर लुटली.

    इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने, आपल्या लाडक्या अंकुशसोबत काहीवेळ घालवण्याची नामी संधी बच्चेकंपनीने पुरेपूर लुटली.

  • खास करून, निलांबरी बसमधून मरीन ड्राईव्हची अविस्मरणीय सफर त्यांना घडली. लोकांना मदत करणा-या 'देवा'ची भूमिका अंकुश त्याच्या आगामी सिनेमात साकारात असून, ख-या आयुष्यातदेखील तो अगदी 'देवा' या पात्रासारखाच आहे.

    खास करून, निलांबरी बसमधून मरीन ड्राईव्हची अविस्मरणीय सफर त्यांना घडली. लोकांना मदत करणा-या 'देवा'ची भूमिका अंकुश त्याच्या आगामी सिनेमात साकारात असून, ख-या आयुष्यातदेखील तो अगदी 'देवा' या पात्रासारखाच आहे.

  • अंकुशने स्वतः त्याच्यापरीने अनेकांना मदत केली असून, सामाजिक कार्यातदेखील तो नेहमीच पुढे असतो. त्याच्या याच स्वभावामुळे अतरंगी 'देवा' ने साजरा केलेला 'बालदिन' त्याच्यासाठीदेखील एक खास दिवस ठरला. अंकुशने या सर्व मुलांसोबत गप्पा-गोष्टी करत, त्यांना खाऊ आणि भेटवस्तूदेखील दिल्या.

    अंकुशने स्वतः त्याच्यापरीने अनेकांना मदत केली असून, सामाजिक कार्यातदेखील तो नेहमीच पुढे असतो. त्याच्या याच स्वभावामुळे अतरंगी 'देवा' ने साजरा केलेला 'बालदिन' त्याच्यासाठीदेखील एक खास दिवस ठरला. अंकुशने या सर्व मुलांसोबत गप्पा-गोष्टी करत, त्यांना खाऊ आणि भेटवस्तूदेखील दिल्या.

  • मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' सिनेमा येत्या १ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून, तेजस्विनी पंडित हिची देखील यात प्रमुख भूमिका आहे.

    मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' सिनेमा येत्या १ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून, तेजस्विनी पंडित हिची देखील यात प्रमुख भूमिका आहे.

अन्य फोटो गॅलरी