‘विरुष्का’ची जादू
- 1 / 7
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
- 2 / 7
नुकताच विरुष्काचा लग्न सोहळा अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत पार पडला.
- 3 / 7
विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावरून त्यांच्या लग्नाचे वृत्त सर्वांना दिले होते.
- 4 / 7
आपलं सेलिब्रिटीपणही जपायचं आणि खासगी आयुष्यही तितक्याच शानदारपणे अनुभवायचं हा नवा पायंडा चांगलाच रुजत चालला आहे. समाजमाध्यमांमुळे नियंत्रित पद्धतीने आपल्याला हवे असणारे क्षण लोकांसमोर आणणं हे आता सेलिब्रिटींना सहजशक्य झालं आहे.
- 5 / 7
येत्या २१ तारखेला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत विरुष्काच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.
- 6 / 7
विरुष्काच्या वेडिंग डेस्टिनेशनपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. यातच या दोघांनी हनिमूनचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आणि ही जोडी हनिमूनला कुठे गेली यावर तर्क लढवले जाऊ लागले.
- 7 / 7
लवकरच अनुष्का तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तर विराट क्रिकेट सामन्यांसाठी द. आफ्रिकेला रवाना होईल.