बॉलिवूडमधील कथित जोडपं मलायका- अर्जुन पुन्हा एकत्र
- 1 / 5
बॉलिवूड वर्तुळात कोणत्या कलाकाराचं नाव कोणासोबत आणि कधी जोडले जाईल याचा काही नेम नाही. असंच नाव अभिनेत्री मलायका अरोरा-खान आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं जोडलं गेलं. या दोघांच्या नात्यामुळेच बी टाऊनमध्ये सर्वांना ‘मेड फॉर इच अदर कपल’ वाटावं अशा मलायका -अरबाजने घटस्फोट घेतला. मात्र असं असली तरी या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आणणाऱ्या अर्जुनबरोबर अजूनही मलायका वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतं.
- 2 / 5
- 3 / 5
याआधी लॅक्मे फॅशन वीकमध्येही दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यावेळीही कॅमेरांपासून लपण्याचा प्रयत्न त्यांनी केला नव्हता. साऱ्यांचं लक्ष मलायका-अर्जुननेकडेच वेधलं होतं.
- 4 / 5
या दोघांनीही कधीच उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. अर्जुन माझा केवळ चांगला मित्र आहे असं मलायका एका मुलाखतीत म्हणाली.
- 5 / 5
मलायका आणि अर्जुनला पुन्हा एकदा एकत्र पाहिल्याने त्यांच्या नात्याविषयी कलाविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.