-
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर हा 'जागतिक अभियंता दिन' म्हणून साजरा होतो. नवनवीन संकल्पनांचा आधार घेत इंजिनीअरिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणे हीसुद्धा राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठी प्रयोगशील भूमिका असते. बॉलिवूडमधील बऱ्याच प्रसिद्ध कलाकारांनी इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. बॉलिवूडमधील या 'इंजिनीअर्स'बद्दल जाणून घेऊयात..

सुशांत सिंह राजपूत सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा असून तो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. ऑल इंडिया एन्ट्रान्स एक्झाम देऊन त्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सुशांतने केमिकल इंजिनीअरींगला प्रवेशही घेतला होता. मात्र यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर करायचे असे ठरवले. 
क्रिती सनॉन 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री क्रिती सनॉनने जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर तिला मॉडेलिंग ऑफर्स मिळू लागले. मॉडेलिंगनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 
तापसी पन्नू दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नूसुद्धा कम्प्युटर इंजिनीअर आहे. चित्रपटात काम करण्याआधी ती एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. 
सोनू सूद यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभिनेता सोनू सूदने इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली. मात्र इंजिनीअरिंगमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याने सोनूने अभिनयाकडे त्याचा मोर्चा वळवला. 
कार्तिक आर्यन सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा इंजिनीअर आहे. डीवाय पाटील कॉलेजमधून तो शिक्षण घेत होता. बॉलिवूडमध्ये काम करता करता त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. 
कादर खान विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते कादर खान यांनीसुद्धा इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. साबू सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ते प्राध्यापकसुद्धा होते.
हरमनप्रीत ट्रॉफी घेताना जय शाह यांच्या पाया पडली, ट्रॉफीसह संघाचं अनोखं सेलिब्रेशन; जेमिमाचा मैदानावर झोपून सेल्फी; VIDEO