-

'शक्तीमान' हा सुपरहिरो कोणाला ठाऊक नसेल तर नवलच! सप्टेंबर १९९७ मध्ये 'डीडी १' वाहिनीवर ही मालिका सुरू झाली आणि सलग आठ वर्षे ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. या मालिकेची मूळ संकल्पना ही मुकेश खन्ना यांचीच होती आणि त्यांनीच 'शक्तीमान' ही भूमिका साकारली. मालिकेच्या अगदी पहिल्या एपिसोडपासून (पार्ले जी) प्रायोजक मिळाले होते.
मुकेश खन्ना- शक्तीमान/ गंगाधर निसर्गाच्या पाच घटकांपासून भारताच्या पहिल्या सुपरहिरोला (शक्तीमान) त्याची शक्ती मिळाली होती. फोटोग्राफर पंडीत गंगाधर म्हणजेच विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री हाच शक्तीमान होता. स्वत:च्या शक्ती लपवण्यासाठी त्याने ते रुप धारण केलं होतं. शक्तीमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांचे सध्या एक युट्यूब चॅनेल आहे. इंडस्ट्रीमधले ट्रेण्ड्स, त्यांचा प्रवास याविषयीचे व्हिडीओ ते या चॅनेलवर पोस्ट करत असतात. शक्तीमानची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. वैष्णवी मर्चंट- गीता विश्वास गीता विश्वासची भूमिका अभिनेत्री वैष्णवी मर्चंटने साकारली होती. एका वृत्तपत्रातील धाडसी महिला पत्रकाराची ही भूमिका होती. शक्तीमानविषयीच्या बातम्या देणारी ती पहिलीच पत्रकार होती. शक्तीमानचं गीतावर प्रेम असतं पण तो ते कधीच जाहिररित्या कबूल करू शकत नाही. गीताच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. कथेतून तिची भूमिका काढून टाकल्यानंतर चाहत्यांनी तिला परत आणण्यासाठी निदर्शनेसुद्धा केली होती. वैष्णवीने नंतर चित्रपटांची वाट धरली असली तरी छोट्या पडद्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. 'छूना है आसमां', 'सपने सुहाने लडकपन के', 'टशन-ए-इश्क' या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या. सुरेंद्र पाल- तमराज किल्विश शक्तीमानसोबतच प्रसिद्ध झालेली भूमिका म्हणजे तमराज किल्विशची. ही खलनायकी भूमिका साकारली अभिनेते सुरेंद्र पाल यांनी. 'अंधेरा कायम रहे' हा त्याचा डायलॉग आजही अनेकांना लक्षात असेल. या मालिकेनंतर सुरेंद्र यांनी बऱ्याच इतर मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. 'महाभारत'मधील द्रोणाचार्य, 'चाणक्य'मधील अमात्य राक्षस, 'देवों के देव महादेव'मधील दक्ष आणि 'सूर्यपूत्र कर्ण'मधील परशुराम अशा आध्यात्मिक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. 'जाना ना दिल से दूर' या मालिकेत ते नुकतेच झळकले. ललित परिमू- डॉ. जॅकल वैज्ञानिक डॉ. जॅकलची भूमिका अभिनेते ललित परिमू यांनी साकारली होती. हा वैज्ञानिक किल्विशसाठी काम करायचा. डॉ. जॅकल सुरुवातीला सज्जन माणूस होता. मात्र त्याची शिष्यवृत्ती नाकारल्यानंतर किल्विश त्याला प्रयोगशाळा पुरवतो. तेव्हापासून तो किल्विशसाठी काम करू लागतो. ललित हे नुकतेच 'मुबारका' या चित्रपटात झळकले होते. ते रंगमंचावरसुद्धा सक्रिय आहेत.
Photos: ‘शक्तीमान’मधील कलाकार सध्या काय करतात?
शक्तीमानपासून किल्विशपर्यंत सर्व कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करायचे. पाहा त्यांचे आताचे फोटो
Web Title: The actors of shaktimaan where are they now ssv