Photo : चित्रविचित्र मेकअप! या अभिनेत्री झाल्या ट्रोलच्या शिकार
- 1 / 5
प्रियांका चोप्रा - बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा तिच्या विचित्र मेकअपमुळे ट्रोल झाली. मेट गाला २०१९ मध्ये प्रियांकाने केलेल्या मेकअपमुळे नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडविली होती.
- 2 / 5
कंगना रणौत - बॉलिवूडची क्वीन कंगना नेहमी परफेक्ट मेकअपमध्ये पाहायला मिळते. मात्र एकदा ओव्हर मेकअप केल्यामुळे ती ट्रोल झाली होती.
- 3 / 5
ऐश्वर्या राय बच्चन- बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची चर्चा विदेशापर्यंत होताना दिसते. अनेक वेळा सुंदर दिसण्यामुळे चर्चेत येणारी ऐश्वर्या एकदा तिच्या खराब मेकअपमुळे चर्चेत आली होती.
- 4 / 5
राखी सावंत - सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असलेली राखी सावंत अनेक वेळा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर यापूर्वीदेखील ती बऱ्याचदा ट्रोल झाली आहे.
- 5 / 5
गौरी खान - अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान कलाविश्वामध्ये सक्रिय नसली तरीदेखील तिच्या ग्लॅमरस लूकची कायम चर्चा होते. मात्र एकदा विचित्र मेकअप केल्यामुळे ती ट्रोल झाली होती.