-
देशातील सर्वात मोठ्या चित्रपट अभिनेत्यांपैकी महत्वाचे नाव म्हणजे बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान. शाहरुख खानची एकूण संपत्ती काही हजार कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते. त्याची वार्षिक कमाईच २५६ कोटी इतकी असल्याचे वृत्त आहे. अर्थात इतकी कमाई असल्यावर त्याची लाईफस्टाइलही तितकीच महागडी आहे. शाहरुख अनेक भन्नाट गोष्टींचा मालक आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण महागड्या गाड्या, घरे, घड्याळ्यांबरोबरच अशा अनेक गोष्टी शाहरुखकडे आहेत ज्यांच्याबद्दल जाणून घेण्यास तुम्हाला नक्कीच आवडेल.
-
शाहरुख एका महागड्या व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे. तब्बल चार कोटी किंमतीची ही शाहरुखची खास व्हॅनिटी व्हॅन दिलीप छाबडिया यांनी डिझाईन केली आहे. शुटिंगदरम्यान अनेकदा शाहरुख आरामासाठी या व्हॅनिटी व्हॅनचा उपयोग करतो.
-
शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुखसुविधा उपलब्ध आहेत. ही व्हॅन तयार करण्यासाठी ४५ ते ६० दिवस लागले. भारतातील सर्वात उत्तम अशी व्हॅनिटी असल्याचे बोलले जाते. या व्हॅनचा तळभाग हा काचेचा असून वरच्या भागासाठी लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे.
-
शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये विशेष मेक-अप चेअर, कपडे ठेवण्यासाठी वॉरड्रॉब, पॅन्ट्री, शय्यागृह, शॉवर अशा सुविधा आहेत. केवळ आय पॅडवरून किंग खान या सुविधा नियंत्रित करु शकेल, अशी सुविधाही यात करण्यात आली आहे.
-
इंग्लंडमधील पार्क लेन परिसरामध्ये शाहरुखचा बंगला आहे. या परिसरामध्ये जगातील सर्वात महागड्या घरांपैकी काही गर्भश्रीमंताची घरे आहेत. २००९ साली शाहरुखनेही येथे घर घेतले आहे. शाहरुखने विकत घेतलेल्या या घराची किंमत १७२ कोटी इतकी असल्याचे समजते.
-
शाहरुखकडे बीएमडब्यू या कंपनीच्या महागड्या गाड्या आहेत. यामध्ये बीएमडब्यू-६ सीरीज, बीएमडब्यू-७ सीरीज आणि बीएमडब्यू आय एट या गाड्यांचा समावेश आहे. बीएमडब्यू-६ सीरीजची किंमत ५४ लाख ४३ हजार (५८ हजार पौंड) इतकी आहे.
-
शाहरुखकडे असणाऱ्या बीएमडब्यू-७ सीरीजची किंमत ५६ लाख ३२ हजार (६० हजार पौंड) आहे.
-
शाहरुखच्या मालकीच्या बीएमडब्यू आय एटची किंमत जवळजवळ एक कोटी रुपये इतकी आहे.
-
दुबईमध्ये समुद्रकिनारी शाहरुखचा मोठा व्हिला आहे. १४ हजार स्वेअर फूटांचा हा व्हिला दुबईमधील सर्वात सुंदर व्हिलांपैकी एक आहे. या व्हिलाची किंमत २४ कोटी इतकी आहे.
-
मुंबईमधील सर्वाधिक पाहण्यासाऱ्या घरांपैकी एक असणारे घर म्हणजे शाहरुखचा मन्नत बंगला. त्याकाळी त्याने १५ कोटींना घेतलेल्या या बंगल्याची आताची किंमत तुम्हाला तोंडात बोटं घालण्यास भाग पाडेल. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये इतकी आहे.
-
६००० चौरस फुटांच्या मन्नत या बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे. या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय.
-
वांद्र्यामध्ये असणाऱ्या शाहरुखच्या मन्नत या बंगल्याच्या बाहेर त्याची झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची कायमच गर्दी असते.
-
शाहरुख खान हा क्रिकेटचा मोठा चाहता आहे. त्यामुळेच त्याने २००८ साली देशामध्ये आयपीएल ही स्पर्धा सुरु झाली त्यावेळी त्याने कोलकाता नाईट रायडर्स या संघाची मालकी विकत घेतली. आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये शाहरुख संघाची पाठराखण करताना दिसतो. शाहरुख सहमालक असणाऱ्या केकेआर संघाची किंमत ५४८ कोटी इतकी आहे.
-
महागड्या चारचाकी गाड्यांचा चाहता असलेला शाहरुख मोटारसायकलचा मोठा चाहता नाही. तरीही शाहरुखने मोठ्या हैसेने हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉक ही क्रुझर बाईक विकत घेतली आहे. या बाईकची किंमत १० लाख रुपये इतकी आहे.
-
शाहरुख चक्क चंद्रावरील जमीनीचाही मालक आहे. शाहरुखनेच दिलेल्या माहितीनुसार त्याची एक ऑस्ट्रेलियन चाहती अनेक वर्षांपासून लूनार रिपलब्लिक सोसायटीच्या माध्यमातून चंद्रावर त्याच्या नावाने जमीन विकत घेत होती.
-
लूनार रिपलब्लिक सोसायटीने केलेल्या या चंद्रावरील जमीनीच्या विक्रीमध्ये एक एकर जमीनीची किंमत अडीच हजारहून अधिक आहे. शाहरुखला नुकतीच या जमीनीच्या मालकीचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.
Tejashwi Yadav Election Result: तेजस्वी यादव यांचा अखेर विजय; भाजपाच्या सतीश कुमार यांचा केला पराभव