-

बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रिटींनी आपल्या 'सेकंड इनिंग’ची आखणी केली आहे. प्रत्येक कलाकाराला चित्रपटसृष्टीत यश मिळेलच असं नाही. त्यामुळे चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीचा एकंदर आढावा घेत काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी ‘प्लॅन बी’ तयारच ठेवले आहेत. चला तर मग पाहूया सेलिब्रिटींचे प्लॅन बी आहेत तरी काय?
-
आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी दीक्षित एक चांगली नृत्यांगनाही आहे. नृत्याची हीच आवड तिने व्यवसायातही रुपांतरित केली. ‘धकधक गर्ल’ माधुरी एक ऑनलाइन डान्स अकॅडमी चालवते. या माध्यमातून नृत्याची आवड असणाऱ्यांसाठी ती नृत्य शिकवते.
चित्रपटातील स्टंटसाठी ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण, गुजरातमधील चारंका सौरउर्जा प्रकल्पातही भागधारक आहे. या प्रकल्पात त्याने बरीच गुंतवणूक केल्याचंही सांगितले जाते. याशिवाय त्याची ‘देवगण एण्टरटेन्मेंट सॉफ्टवेअर लिमिटेड’ नावाची निर्मितीसंस्थाही आहे. या निर्मितीसंस्थेअंतर्गत ‘राजू चाचा’, ‘यू, मी और हम’ आणि ‘ऑल द बेस्ट’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने लेखन क्षेत्राकडे मोर्चा वळवला. सध्या ती एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखनही करते. याशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय झाली असून, इंटेरियर डिझायनिंगमध्येही तिने स्वत:चा ठसा उमटवला आहे. -
अक्षय कुमार
-
‘फिटनेस फ्रिक’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा फॅशन वेबसाइट चालवते. सुझान खान, बिपाशा बासू यांच्या साथीने मलायका ‘द लेबल लाइफ’ नावाची वेबसाइट चालवते.
-
सुनील शेट्टी हॉटेल व्यवसायात उतरला आहे. त्याशिवाय त्याची स्वत:ची निर्मितीसंस्था सुद्धा आहे. ‘पॉपकॉर्न एण्टरटेन्मेंट’ नावाच्या या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘खेल’, ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘मिशन इस्तानबुल’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती.
अभिनय क्षेत्रात सध्या लारा दत्ता सक्रिय नसली तरीही ती दुसऱ्याच एका कलात्मक क्षेत्रात सक्रिय आहे. ‘छाबरा ५५५’ या क्लोथिंग ब्रॅण्डच्या साथीने लाराने तिचं साड्यांचं कलेक्शन लाँच केलं आहे. त्याशिवाय तिची स्वत:ची निर्मितीसंस्थाही आहे. अर्जुन रामपाल जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला व्यवसायिकही आहे. अर्जुनची ‘चेसिंग गणेशा’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्याशिवाय दिल्लीत त्याचा ‘लॅप- लाऊंज बार अॅण्ड रेस्तरॉ’सुद्धा आहे. अभिनय क्षेत्रातील इनिंग झाल्यानंतर अभिनेता मिथून चक्रवर्ती रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. याशिवाय ‘पापराझी प्रॉडक्शन’ नावाची त्यांची निर्मितीसंस्थासुद्धा आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
चित्रपटांमध्ये अपयश मिळालं तरीही या क्षेत्रात सक्रिय राहतील बी-टाऊन सेलिब्रिटी
Web Title: Bollywood actors income sources other than movies ssv